कॅमेऱ्यासमोर अनेक कलाकार मंडळींना राग अनावर झाल्याच्या घटना आपण पाहिल्याच असतील. पापाराझी अनेक ठिकाणी बॉलीवूड कलाकारांना फॉलो करत असतात. घर असो किंवा विमानतळ प्रत्येक ठिकाणी पापाराझी कलाकारांचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी हजर असतातच. अशात अनेकदा या कलाकारांचे पापाराझींबरोबर वादही होतात. आत्तापर्यंत जॉन अब्राहम, कपिल शर्मा, जया बच्चन, तापसी पन्नूसारख्या कित्येक कलाकार मंडळींचा कॅमेऱ्यासमोर राग अनावर झाला आहे. बी-टाऊनमध्ये या प्रकरणाची बरीच चर्चाही रंगली. दरम्यान, आता सलमान खानच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा- ‘अ‍ॅनिमल’मधील बॉबी देओलचं पात्र मुस्लीमच का? दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणाला, “कुणालाच हिंदू धर्मात…”

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर सलमानचे निरनिराळे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच सलमानने त्याचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा ५३ वा वाढदिवस साजरा केला. घरच्यांच्याच उपस्थितीत सोहेलच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीनंतर सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पापाराझींवर भडकल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा-

सोहेलच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर सलमान त्याच्या आई-वडिलांबरोबर गाडीत बसत होता. सलमानला बघून पापाराझी त्याचे फोटो व व्हिडीओ घेण्यासाठी पुढे आले. पापाराझींना बघून सलमान भडकला व त्याने त्यांना मागे सरका असे सांगितले. व्हिडीओमध्ये सलमान रागात पापाराझींना ‘मागे सरका’ असे बोलताना दिसत आहे.

सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर दिवाळीच्या मुहूर्तावर (१२ नोव्हेंबरला) त्याचा ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४४.५ कोटींची कमाई केली होती. मात्र, हळूहळू या चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसली. ‘टायगर ३’ हा सलमान खान कतरिना कैफ यांच्या स्पाय सिनेमाचा तिसरा भाग आहे. यापूर्वी या फ्रेंचायजीचे ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट आले होते. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. ‘टायगर ३’मध्ये सलमान व कतरिना व्यतिरिक्त इमरान हाश्मीची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.