Tiger 3 Leke Prabhu ka naam song : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘टायगर ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘लेके प्रभु का नाम’ हे गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे. अगदी याच्या टीझरपासूनच हे गाणे ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते व याची आतुरतेने वाट पाहत होते. यामागील आणखी एक खास कारण म्हणजे सलमान खानच्या चित्रपटात पहिल्यांदाच प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने हे गाणे गायले आहे.

‘लेके प्रभू का नाम’ या गाण्यात पुन्हा एकदा सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जबरदस्त केमिस्ट्री आणि एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला आहे. या गाण्यात तुम्हाला ‘माशाअल्लाह’ आणि ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ या दोन्ही गाण्यांची आठवण नक्कीच येईल. सलमानचे चाहतेसुद्धा त्याच्या या दोन्ही गाण्यांची तुलना करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : मलायका अरोराला व्हायचं होतं शिक्षिका; पन्नाशीतही सुपरफिट, आणि हॉट दिसणाऱ्या अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

नेटकऱ्यांच्या ओठांवर हे गाणे बसले असून याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याला युट्यूबवर अवघ्या काही तासांतच ७ लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे गीत अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून प्रीतम यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहेत. याबरोबरच अरिजित सिंह आणि निकिता गांधी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

तब्बल १० वर्षांच्या वादानंतर अरिजितने सलमानसाठी प्रथमच गाणं म्हंटलं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि अरिजितमध्ये वाद झाला होता. यानंतर सलमान त्याच्यावर चांगलाच चिडला. सलमानने त्याच्या ‘सुलतान’ चित्रपटातील अरिजितचे गाणेही काढून टाकले होते. अरिजीतने सोशल मीडियावर माफीही मागितली होती, पण दोघांमधील गैरसमज दूर व्हायला इतकी वर्षं गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टायगर ३’ १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान खान व कतरिना कैफसह इम्रान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा हिस्सा असणार आहे.