बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचे जगभरात लाखो चाहते आहेत. आजतागायत अनेक अभिनेत्रींबरोबर सलमानचं नाव जोडण्यात आलं. अगदी लग्नापर्यंत गेलेल्या गोष्टी अयशस्वी ठरल्या. संगीता बिजलानीबरोबर सलमान लग्न करणार होता, अशीही चर्चा सुरू होती. सलमानने त्याआधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली होती; परंतु तिनं या लग्नास नकार दिल्याचं वृत्त समोर आलंय.

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार संजय लीला भन्साळी यांची भाची अभिनेत्री शर्मिन सेहगल मेहता हिला सलमाननं लग्नाची मागणी घातली होती. परंतु, तिनं लग्नाचा हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा… VIDEO: ट्रोलर्ससाठी ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शर्मिन म्हणाली, की ती जेव्हा दोन ते तीन वर्षांची होती तेव्हा ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर ती पहिल्यांदा सलमान खानला भेटली होती. तेव्हाचा किस्सा सांगत ती म्हणाली, की सलमान खाननं तिला माझ्याशी लग्न करशील का, असं मस्करीत विचारलं होतं. त्यावर तिनं हसत हसत ‘नाही’, असं उत्तर दिलं होतं.

शर्मिन अजूनही सलमानची फॅन आहे हे सांगताना ती म्हणाली की, ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यात सलमान तिला चाहती म्हणून खूप आवडतो. तिनं स्पष्ट केलं की, इतक्या लहान वयात तिला लग्नाची संकल्पना समजली नव्हती आणि म्हणूनच तिनं नाही, असं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा… ठरलं तर मग: सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य? पाहा प्रोमो

मामा संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही शर्मिननं शेअर केला. १८ वर्षांची असताना ‘देवदास’ बघताना तिला कळलं होतं की, संजय लीला भन्साळी हे तिचे मामा आहेत. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये तिला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिल्याबद्दल शर्मिननं भन्साळी यांचे आभार मानले आणि त्यांचं कौतुकही केलं. भन्साळी हे खूप मेहनती आणि एक उत्तम मार्गदर्शक आहेत. त्यांनीच ‘हीरामंडी’दरम्यान तिला तिची स्वतःची वेगळी बाजू दाखवली.

हेही वाचा… “मी चुकून अभिनेता झालो”, महाराष्ट्र बंद नसता तर आमिर खान झाला नसता सुपरस्टार, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शर्मिनच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर शर्मिन संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर १ मे रोजी प्रदर्शित झाली. शर्मिनसह या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख या अभिनेत्रीदेखील आहेत.