सलमान खानच्या ‘गॉडफादर’ चितरपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉंचसाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सलमान खान आणि मेगास्टार चिरंजीवी त्यांच्या आगामी ‘गॉडफादर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला पोहोचले. तिथे त्या दोघांनी मीडियाशी संवाद साधला आणि त्यासोबतच त्यांच्या चित्रपटाविषयीचे अनेक किस्से शेअर केले. यादरम्यान, सलमान खानने त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

आणखी वाचा : “मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

‘गॉडफादर’च्या ट्रेलर लॉंच दरम्यान सलमान खानने तो एका आगामी चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता राम चरणबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट म्हणजे ‘किसी का भाई किसी की जान.’ ‘गॉडफादर’च्या ट्रेलर लॉंच दरम्यान संवाद साधताना सलमान खानला त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातील राम चरणच्या कॅमिओ रोलविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सलमानने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “ही खरी गोष्ट आहे. आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो. मी वेंकी उर्फ ​​व्यंकटेश डग्गुबतीसोबत शूटिंग करत असल्याने राम चरण मला भेटायला आला. तो म्हणाला मला तुझ्यासोबत काम करायचे आहे, मी नाही म्हणालो, मग तो म्हणाला मला तुझ्यासोबत काम करायचे आहे आणि मला तुझ्या आणि वँकीसोबत पडद्यावर यायचे आहे.”

पुढे सलमान खानने सांगितले, “मला वाटले की तो मस्करी करतोय, म्हणून मी म्हणालो की ठीक आहे. पण दुसऱ्या दिवशी तो व्हॅन, पोशाख आणि बाकी सगळ्या गोष्टी घेऊन सेटवर तयार होता. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झालो. मी त्याला विचारलं, जेव्हा “तू इथे काय करतोस?” त्यावर तो म्हणाला, “तू मला खूप आवडतोस मला मला तुझ्यासोबत काम करायचं आहे, तू मला ते करुदे.” त्यावर मी तयार झालो आणि आम्ही एकत्र काम केलं.

हेही वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान ?, चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६ ऑगस्टला सलमानने ‘किसी का भाई.. किसी की जान’ चित्रपटातील त्याचा लूक असलेला व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर त्याने या चित्रपटाचा ५९ सेकंदाचा टीझर व्हिडीओ शेअर केला. या दोन्ही व्हिडीओला सलमानच्या चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आता त्यात राम चरणची एंट्री होणार हे कळल्यावर प्रेक्षक या चित्रपटाबद्दल आणखीनच उत्सुक झाले आहेत.