प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ८ मार्चला निधन झालं. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने बॉलिवूड कलाकारांना धक्का बसला होता. सलमान खानने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं होतं. निधनापूर्वी सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम’च्या सिक्वेलबाबत सलमान खानशी चर्चा केली होती.

सलमान खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. २० वर्षांपूर्वी ‘तेरे नाम’ची स्क्रीप्ट घेऊन सतीश कौशिक सलमानकडे गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक लाईन होती. पण ही कल्पना सलमानला आवडली. तेव्हा ‘तेरे नाम’ चित्रपटात जुही चावला असणार होती. या चित्रपटाचं दिग्दर्शनही सतीश कौशिक यांनीच केलं होतं.

हेही वाचा >> “गाडी गेट तोडून समोरच्या नाल्यात गेली अन्…”, रोहित शेट्टीने सांगितला बालपणीचा ‘तो’ किस्सा, म्हणाला, “त्यानंतर वडिलांनी…”

सतीश कौशिक यांच्या निधनापूर्वी सलमान व त्यांचे चांगले संबंध असल्याचं अभिनेत्याने सांगितलं. कौशिक यांनी सलमान व अरबाज खानच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. त्यांनी एका चित्रपटासाठी स्क्रीप्टही लिहिली होती. या चित्रपटाचे ते दिग्दर्शन करणार होते. दिल्लीत गेल्यानंतर वैयक्तिक काम पूर्ण केल्यानंतर कौशिक या चित्रपटासाठी तयारी करणार होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.

हेही वाचा>> पतीचं मेहुणीबरोबर अफेअर, घटस्फोट देत केलेलं दुसरं लग्न अन्…; मृत्यूनंतर तीन दिवस घरातच पडून होता प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौशिक यांनी ‘तेरे नाम’च्या सीक्वेलबाबत चर्चा केल्याचा खुलासा सलमान खानने केला. तो म्हणाला, “२० वर्षांनंतर काय घडलं असेल, याबाबत कौशिक यांनी चर्चा केली होती. तेरे नामच्या सीक्वेलसाठी त्यांनी एक प्लॉटही तयार केला होता. लवकरच स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात करेन, असंही ते म्हणाले होते.” भविष्यात तेरे नामच्या सीक्वेलबाबत नक्की विचार करणार असल्याचंही सलमानने सांगितलं.