Salman Khan’s Bodyguard Shera Owns Expensive Car : सलमान खान त्याच्या व्यवसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. परंतु, त्याच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम त्याच्याबरोबर असते. तो म्हणजे त्याचा बॉडीगार्ड शेरा. गेल्या अनेक वर्षांपासून तो सलमानचा अंगरक्षक म्हणून काम करत आहे. अशातच आता शेराबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. सलमानच्या अंगरक्षकाकडे कोट्यवधींची महागडी गाडी असून त्याच्याकडे भरपूर संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे.

शेराने १९९७ मध्ये सलमानचा बॉडीगार्ड म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी सलमानचा भाऊ सोहेल खानने त्याला सलमानच्या सुरक्षेसाठी विचारलं होतं. शेराने २०११ मध्ये ‘मिंट’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. त्यापूर्वी शेराने हॉलीवूडमधील कीनू रीव्हज (Keanu Reeves) यांच्या भारत दौऱ्यानिमित्त त्यांचा बॉडीगार्ड म्हणून काम केलेलं. त्या मुलाखतीमध्ये शेरा म्हणाला, त्याने त्यावेळी त्याची स्वत:ची कंपनी सुरू केलेली. आणि त्यावर्षी १९९५मध्ये सोहलने त्याला सलमानबरोबर राहशील का असं विचारलं होतं तेव्हा त्यांची डील झालेली.

सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला शेरा म्हणालेला, “मी भाईसाठी (सलमान) बंदुकीची गोळी खायलाही तयार आहे. भाईसुद्धा त्यांच्या कुटुंबियांसाठी, मित्रांसाठी १० बंदुकीच्या गोळ्या खाऊ शकतात. त्याच कार्यक्रमात सलमान खान शेराबद्दल म्हणालेला, “माझा शेरावर खूप विश्वास आहे. पैसा, कुटुंब, मित्र, महिला सगळ्यांबाबत माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे.”

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची संपत्ती किती?

माध्यमांच्या वृत्तानुसार शेराकडे बरीच संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्याकडे, १.४ कोटींची गाडी असून त्याच्याकडे १०० कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्याने १.४ कोटींची रेंज रोव्हर ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. यासह त्याने मुलाखतीमध्ये टायगर नावाने सुरक्षा क्षेत्रात स्वत:ची कंपनी सुरू केल्याचही म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शेराबद्दल बोलायचं झालं तर शेराचा जन्म मुंबईतील अंधेरी येथे शिख कुटंबात झाला होता. त्याचं मूळ नाव गुरमीत सिंग जॉली असं आहे. ११ वी नंतर त्याला महाविद्यालयातून काढण्यात आलेलं कारण त्याला बॉडी बिल्डींग या गोष्टींची खूप आवड होती. त्यानंतर त्याने १९८७ मध्ये ज्युनिअर मिस्टर मुंबई हा किताब जिंकला.