बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. संजय दत्त हा त्याच्या आगामी केडी-द डेव्हिल या चित्रपटाच्या शूटींगमध्ये सध्या व्यस्त आहे. या शूटींगदरम्यान तो जखमी झाल्याचे वृत्त समोर आलं होतं. नुकतंच त्याने यावर स्पष्टीकरण देत हे वृत्त फेटाळलं आहे.

संजय दत्त हा सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हे शूटिंग बेंगळुरूजवळ सुरू आहे. नुकतंच या चित्रपटात बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या दरम्यान स्फोट होऊन संजय दत्त हा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आलं होतं. संजयचे कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत, असेही म्हटलं जात होतं.
आणखी वाचा : “मी आरशात पाहिलं अन्…” त्वचेच्या रंगात झालेल्या बदलावर काजोलचे स्पष्टीकरण

मात्र नुकतंच संजय दत्तने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने हे सर्व वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच त्याने त्याच्या चाहत्यांचे आभारही व्यक्त केले आहेत.

“मी अनेक ठिकाणी माझ्या जखमी होण्याचं वृत्त वाचले. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की हे सर्व वृत्त पूर्णपणे खोटं आहे. देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरा आहे. सध्या मी ‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. माझी टीम माझे सीन शूट करताना अतिरिक्त खबरदारी घेत आहे. माझी काळजी करणाऱ्या सर्वांचे आभार”, असे संजय दत्तने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘मराठी सिनेसृष्टीतील तुझी क्रश कोण?’ वैभव तत्त्ववादी म्हणाला “त्या भेटल्या की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ॲक्शन डायरेक्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटात संजय दत्त हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.