आज (८ मार्च रोजी) आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र साजरा केला जातोय. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या सहकलाकारांना, मैत्रिणींना, आईला आणि आपल्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. अशाचप्रकारे सारा अली खानने एक व्हिडीओ शेअर करून आपल्या आईला म्हणजेच अमृता सिंहला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

साराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात महिला दिनाच्या शुभेच्छा देत सारा म्हणाली, “आज महिला दिनानिमित्त मी माझ्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ती म्हणजे माझी आई. मला कुठे ना कुठे असं सतत वाटतं की मला जी ताकद मिळाली आहे ती तिच्याकडून मिळाली आहे. ती माझी प्रेरणा आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे.”

“उषा मेहता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, मला कळतचं नाही कशाप्रकारे व्यक्त होऊ. कारण, एवढ्या लहान वयात त्यांनी देशभक्तीसाठी त्यांच्या कुटुंबाचा आणि संपूर्ण आयुष्याचा त्याग केला. त्यांची देशभक्ती एवढी सामर्थ्यवान होती की त्या वेगळ्या राहायला लागल्या. त्यांना माहित होतं की हे सगळ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठीचं आहे. त्यांचा हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. म्हणूनच मी सर्व सुंदर महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते.” असं सारा म्हणाली.

हेही वाचा… “जेव्हा मी माझ्या आईला गमावलं…”, अक्षय कुमारने सांगितले त्याचे भगवान शिवाशी असलेले खास नाते; म्हणाला…

या व्हिडीओला साराने खूप सुंदर कॅप्शनही दिलं आहे. “नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा एखादी स्त्री स्वतःसाठी उभी राहते तेव्हा ती सर्व स्त्रियांसाठी उभी असते. शौर्य आणि सामर्थ्य सगळ्यांमध्ये असतं. फक्त तुम्ही स्वतःला स्वीकारायला हवं, स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि मग उंच भरारी घ्यायली हवी. तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा” अशा प्रभावशाली शब्दांत साराने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा… एकाच दिवशी प्रदर्शित होणार ‘मैदान’ व ‘बडे मियाँ छोटे मियाँ’; क्लॅशबद्दल अजय देवगण म्हणाला, “अक्षय आणि मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, साराचा आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ २१ मार्च २०२४ रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९४२ मधील भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. यात मराठमोळा अभिनेता सचिन खेडेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.