Satish Kaushik Passed Away: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतिश यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह कलाकार मंडळी दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांनी आजवर बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.

सतीश यांचं खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं आहे. त्यांना वैयक्तिक आयुष्यामध्ये बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागला. त्यांच्या मुलाचं वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं होतं. छोट्या मुलाच्या निधनामुळे कौशिक यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर १६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांना मुलगी झाली.

पाहा व्हिडीओ

वयाच्या ५६व्या वर्षी सतिश पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं आहे. ती आता १० वर्षांची आहे. सतिश त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मुलगी व पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करायचे. असाच एक त्यांचा मुलीबरोबर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : काही दिवसांपूर्वीच फॅमिली वेडिंगसाठी जोधपूरला गेले होते सतीश कौशिक, धमाल-मस्ती करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतिश त्यांच्या मुलीसह अगदी आनंदाने डान्स करत आहे. या व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं होतं की, “वंशिकाने मला डान्स करण्यास भाग पाडलं आहे. मी तिला फक्त फॉलो करत आहे आणि आम्ही मजा करत आहोत”. सतिश यांचा हा व्हिडीओ खरंच मनाला चटका लावून जाणारा आहे. या व्हिडीओमधूनच त्यांचं आपल्या मुलीवर किती प्रेम होतं हे दिसून येतं.