Dunki Box office collection Day 1: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान ‘पठाण’ व ‘जवान’नंतर पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. किंग खान व राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित ‘डंकी’ हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. तरी बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनची संख्या पाहता यंदा शाहरुखची जादू फिकी पडणार असंच चित्र सध्या बघायला मिळत आहे. प्रभासच्या ‘सालार’बरोबर होणारी टक्कर आणि स्क्रीन्सवरुन निर्माण झालेला वाद याचा फटका डंकीलाही बसला असल्याचं सांगितलं जात आहे.

अडवांस बुकिंगमध्ये ‘डंकी’ बराच मागे पडला अन् त्याचेच पडसाद याच्या पहिल्या दिवसांच्या कमाईवर उमटल्याचं दिसत आहे. ”डंकी’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहून बऱ्याच लोकांना धक्काच बसू शकतो. ‘डंकी’ हा २०२३ मध्ये शाहरुखचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असल्याचंही सांगितलं जात आहे. ‘पठाण’ व ‘जवान’च्या तुलनेत ‘डंकी’ने फारच कमी कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : Dunki Review: कथा, सादरीकरण अन् अभिनय अव्वल पण…, शाहरुख खानचा ‘डंकी’ नेमका कुठे कमी पडला?

अडवांस बुकिंगमध्ये ‘डंकी’ने जवळपास १५ कोटींची कमाई केली होती. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘डंकी’ने पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचं सर्वाधिक कलेक्शन कलकत्ता येथून झालं असल्याचंही स्पष्ट झालं आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ५७ कोटी तर ‘जवान’ने पहिल्या दिवशी ७४.५० कोटींचा व्यवसाय केला होता. त्यासमोर ‘डंकी’ची कमाई ही फारच कमी असल्याचं स्पष्ट होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही ट्रेड एक्स्पर्टच्या अंदाजानुसार शाहरुखचा ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘जवान’ व ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखच्या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या पण बऱ्याच लोकांच्या पदरी निराशा पडली आहे. राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट परदेशात अवैधरित्या जाणाऱ्या लोकांच्या संघर्षावर बेतलेला आहे. या चित्रपटात शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, अनिल ग्रोव्हर, विक्रम कोचर, बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.