बॉलिवूड स्टार्स नेहमीच त्यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. पण त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलंही नेहमीच चर्चेचा विषय बनतात. शाहरुख खान ची लेक सुहाना ही त्यातलीच एक स्टारकिड आहे. सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत असलेली सुहाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे.
सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अजून सुहाना अभिनय क्षेत्रात आली नसली तरीही तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत ती तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता सुहानाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण या फोटोवर शाहरुख खानने कमेंट करत तिचं एक सिक्रेटच उघड करून टाकलं.
आणखी वाचा : “चांगली संधी वाया घालवली…” ‘ए वतन मेरे वतन’च्या टीझरमुळे सारा अली खान ट्रोल
सुहानाने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत ती काळ्या रंगाचा हॉल्टर नेक वन पीस परिधान केलेली दिसत आहे. तिचा हा फोटो नेटकऱ्यांना चांगलाच आवडला. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं. तर शाहरुखने या फोटोवर कमेंट करत सुहानाचं एक सिक्रेट उघड केलं. त्याने लिहिलं, “खूप सुंदर बेबी. तू घरी जो पायजमा घालतेस त्याच्या अगदी विरुद्ध आहे हे.” आता त्याने केलेली ही मजेदार कमेंट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्या कमेंट्सवर देखील चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.
दरम्यान, शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. यात शाहरुखबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम यात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.