शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली. तर त्याच्या चाहत्यांनी चित्रपट प्रदर्शित होताच मोठा आनंद साजरा केला. सध्या सगळीकडे याच चित्रपटाची हवा आहे. यादरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : ‘पठाण’ चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शाहरुखच्या चाहत्यांनी ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर अगदी कहरच केला. कोणी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडले तर कोणी शाहरुखच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला. इतकंच नव्हे तर काही चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नाचायला सुरुवात केली. आता एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ इंडोनेशियामधील चित्रपटगृहाचा आहे. चित्रपट सुरू असतानाच काही प्रेक्षक जागेवरुन उठले. त्यांनी स्क्रिनजवळ जात चित्रपटामधील ‘झुमे जो पठाण’ गाण्यावर नाचायला सुरुवात केली. तर इतरांनी या गाण्यावर डान्स करणाऱ्या प्रेक्षकांचा व्हिडीओ शूट केला.

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, असा ड्रेस परिधान करत स्वतःच म्हणाली, “तो कोण आहे ज्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. शिवाय ‘झुमे जो पठाण’ गाण्यावर ही मंडळी मनसोक्त थिरकली. दिग्दर्शक विनोद कापरीने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. अजूनही प्रेक्षक ‘पठाण’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. आतापर्यंत ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात ५५० कोटींची कमाई केली आहे.