शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. जगभरात १००० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई करणारा चित्रपट आता बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीज होऊन जवळपास साडेतीन महिन्यांनी बांगलादेशच्या थिएटर्समध्ये पठाण दाखवला जाईल. रिपोर्ट्सनुसार, १२ मे रोजी हा चित्रपट बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणारा ‘पठाण’ हा पहिला हिंदी चित्रपट असेल.

MS धोनीशी अफेअर, पाच वेळा ब्रेकअप अन्…, बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहिलेल्या राय लक्ष्मीबद्दल जाणून घ्या

१९७१ मध्ये बांगलादेशची स्थापना झाली. तेव्हापासून एकही हिंदी चित्रपट तेथे प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे ‘पठाण’ हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे, जो पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणार आहे. बांगलादेशात ‘पठाण’ रिलीज होणार असल्याने वितरक उत्सुक आहेत. यशराज फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय वितरणाचे उपाध्यक्ष नेल्सन डिसोझा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “सिनेमा हा नेहमीच देश, जाती आणि संस्कृतींना जोडणारी शक्ती राहिला आहे. सीमा ओलांडून लोकांना प्रेरणा देण्यासाठी आणि एकत्र आणण्यात सिनेमा महत्त्वाची भूमिका बजावतो. जगभरातील ऐतिहासिक कमाई करणाऱ्या ‘पठाण’ला आता बांगलादेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळणार आहे याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे.”

१५ वर्षांनंतर ‘गजनी’च्या सिक्वेलसाठी आमिरची तयारी? अल्लू अर्जुनशी आहे खास कनेक्शन

नेल्सन डिसोझा पुढे म्हणाले, “पठाण हा बांगलादेशमध्ये १९७१ नंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला आहे. यासाठी आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांचे आभारी आहोत. आम्ही अनेक वर्षांपासून ऐकत आहोत की बांगलादेशमध्ये शाहरुख खानचे खूप चाहते आहेत. शाहरुख खान आणि हा पहिला हिंदी चित्रपट बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपट आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करेल असे आम्हाला वाटते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहमच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.