शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाहरुखचे चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. तर नुकताच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित झाला. या व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा जबरदस्त अंदाज प्रेक्षकांना दिसला. या व्हिडीओ गौरी खानची काय प्रतिक्रिया होती हे आता शाहरुखने उघड केलं आहे.
शाहरुख खान अधूनमधून आस्क एसआरके (AskSRK) या सेशनद्वारे चाहत्यांची संवाद साधतो. तर आज त्याने हे सेशन ट्विटरवर घेऊन चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला. यादरम्यान त्याला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची शाहरुखने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
या सेशन दरम्यान एका चाहत्याने शाहरुख खानला “‘जवान’चा प्रेव्ह्यू व्हिडीओ पाहिल्यावर गौरी खानची प्रतिक्रिया काय होती?” असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुख खान उत्तर देत म्हणाला, “तिला हा व्हिडीओ आवडला. या चित्रपटांमध्ये महिलांचे ज्याप्रमाणे चित्रण करण्यात आलं आहे ते तिला खूप आवडलं.” आता शाहरुख खानचा हे उत्तर खूप चर्चेत आलं असून त्याच्या या ट्विटवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.
तर शाहरुख खानचा हा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान बरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसेल.