शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. सध्या आर्यन अभिनय क्षेत्रात न येता व्यवसाय क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावत आहे. नुकताच त्याने त्याचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. पण आता त्याच्या ब्रँडच्या कपड्यांची किंमत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

आर्यनने नुकताच त्याचा स्वतःचा D’YAVOL X हा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. त्याने स्वतः या ब्रँडच्या जाहिरातीचं दिग्दर्शन केलं आहे. काल, ३० एप्रिल रोजी या ब्रँडच्या साईटवर कपड्यांचं कलेक्शन लॉन्च करण्यात आलं. या साईटवरील कपड्यांची किंमत पाहून नेटकरी आर्यन खानला ट्रोल करू लागले आहेत.

आणखी वाचा : “प्रत्येक पार्टीत आर्यन…” पलक तिवारीचा शाहरुख खानच्या लेकाबद्दल मोठा खुलासा

या ब्रँडअंतर्गत असणाऱ्या एका जॅकेटची किंमत ३० ते ४० हजारांच्या घरात आहे. तर यातील अनेक कपड्यांच्या किमती १ लाखाच्या वर आहेत. एका जॅकेटसाठी आर्यन खान ग्राहकांकडून इतके पैसे घेत आहे हे पाहिल्यावर सोशल मीडियावरून नेटकरी याबाबत विविध प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

एकाने लिहिलं, “आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँडची साईट पाहिली. माझ्याकडे ज्या किमतीचा मोबाइल आहे त्याच्यापेक्षा महाग आर्यन खानच्या या ब्रँडचं जॅकेट आहे. किडनी विकून पेमेंट करायचा ऑप्शन कुठे आहे?”

तर दुसरा नेटकरी म्हणाला, “२ लाख एका जॅकेटसाठी आणि ४५ ते ५० हजार एका हूडीसाठी! आर्यन खान किंवा शाहरुख खान स्वतः आपल्या घरी आपण घेतलेले कपडे पोहोचवायला येणार आहेत का?”

हेही वाचा : Video: “वडिलांकडून काहीतरी शिक…” शाहरुख खानचा लेक आर्यन ‘त्या’ कृतीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आणखी एकाने लिहिलं, “या ब्रँडच्या कपड्यांची किंमत पाहून मला वाटतं की, मी जगातील सर्वात गरीब व्यक्ती आहे.” त्यामुळे आता सर्वत्र त्याच्या या नव्या ब्रँडच्या कपड्यांच्या किमतींची चर्चा आहे.