शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ७ दिवसांमध्येच या चित्रपटाने भारतातून ३०० कोटींहून अधिक तर जगभरातून ६०० कोटींहून अधिक कमाई केली. त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी दिवस-रात्र त्याच्या मुंबईतील मन्नत या बंगल्याबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. पण या चित्रपटाला मिळणाऱ्या यशामधून बाहेर पडत आता शाहरुखने आणखी एका आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
२०२३ हे साल शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण यावर्षी तो ३ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तर त्या व्यतिरिक्त ‘जवान’ आणि ‘डंकी’ या दोन चित्रपटांमध्ये तो यावर्षी झळकणार आहे. दरम्यान आता जवान चित्रपटाच्या सेटवरील त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला झाले अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”
शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. आता त्याच लूकमधील त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो शाहरुख खान लांब केसांमध्ये चेहऱ्याला एक पट्टी गुंडाळून उभा असलेला दिसत आहे. अटली दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. त्याचा शूटिंग सेट वरील हा फोटो बघून चहा तयार चित्रपटासाठी आणखीनच उत्सुक झाल्याचं दिसत आहेत.
हेही वाचा : शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण
जवान या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसेल असं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात त्याच्याबरोबर दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. २ जून २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.