Harmeet Singh post on Ex Wife Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेत. तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. शेफालीचं २७ जूनच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शेफालीच्या निधनानंतर तिचा पहिला पती हरमीत सिंग याने शोक व्यक्त केला आहे.

हरमीत सिंगने इन्स्टाग्रामवर शेफालीचा फोटो पोस्ट करून भावना व्यक्त केल्या. शेफालीबरोबर घालवलेले क्षण कायम खास असतील, असं हरमीतने म्हटलं. तसेच तो शेफालीच्या अंत्यसंस्काराला का येऊ शकला, त्याचं कारणही त्याने सांगितलं.

हरमीत सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याची एक्स पत्नी शेफाली जरीवालाचा फोटो शेअर करून लिहिलं, “माझ्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षणांपैकी एक. शेफालीच्या अचानक निधनाबद्दल ऐकून मी पूर्णपणे हादरलो आहे. मला विश्वास बसत नाहीये. आम्ही खूप वर्षांपूर्वी काही सुंदर वर्षे एकत्र घालवली होती. या आठवणी कायम माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहतील.”

हरमीतने शेफालीचे आई-वडील व पती पराग त्यागीचं सांत्वन केलं. “तिचे आई-वडील सतीश जी, सुनीता जी, तिचा पती पराग त्यागी आणि बहीण शिवानी यांच्याबरोबर माझ्या संवेदना आहेत. युरोपमध्ये असल्याने मी शेफालीच्या अंत्यसंस्काराला येऊ शकत नाही आणि हे खूप वेदनादायक आहे,” असं हरमीत म्हणाला.

shefali hariwala ex husband post on her death
शेफाली जरीवालाच्या एक्स पतीची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

“शेफाली खूप लवकर निघून गेली. मी देवाकडे प्रार्थना करतो की तिच्या आत्म्याला शांती मिळो आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची हिंमत आणि शक्ती मिळो. जय श्री कृष्ण,” असं लिहून हरमीतने शोक व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरमीत सिंग व शेफाली जरीवाला घटस्फोट

पराग त्यागीच्या आधी शेफाली जरीवालाचे पहिले लग्न मीत ब्रदर्सच्या हरमीत सिंगशी झालं होतं. काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी २००४ मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी शेफाली अवघ्या २२ वर्षांची होती. पण काही वर्षांनी त्यांचं लग्न मोडलं. २००९ मध्ये शेफाली व हरमीत वेगळे झाले. शेफालीने हरमीतवर घरगुती हिंसाचार व मानसिक छळाचे आरोप केले होते. घटस्फोटानंतर शेफालीच्या आयुष्यात पराग आला. लिव्ह इनमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर त्यांनी २०१४ साली लग्न केलं होतं.