दोन वर्ष, २७ दिवस आणि १४ तासांनंतर राज कुंद्राने अखेर चेहऱ्यावरील मास्क हटवला आहे. याचनिमित्त होतं त्याच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट. राज कुंद्राचा ‘यूटी ६९’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात राज ही भूमिका त्याने स्वतः साकारली आहे. ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा – Video: “देशात दोन गोष्टी विकल्या जातात सेक्स आणि…”, राज कुंद्राचं वक्तव्य चर्चेत

शाहनवाज अली दिग्दर्शित ‘यूटी ६९’ या चित्रपटात राज कुंद्राची संपूर्ण जेलमधील कहाणी पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये, पोलिसांकडून आणि इतर कैद्यांकडून राज कुंद्राला कशाप्रकारे वागणूक मिळाली हे दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राच्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहीलं आहे की, ऑल द बेस्ट , कुकी. तू एक धाडसी व्यक्ती आहेस. मला तुझ्याबद्दल सर्वात जास्त कौतुक वाटते. ही आहे तुझी हिंमत आणि सकारात्मकता

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, “माणुसकी शिल्लक आहे”

‘यूटी ६९’ या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीशी बोलताना राज कुंद्रा म्हणाला, “जेव्हा मी या चित्रपटाबाबत पहिल्यांदा शिल्पाबरोबर बोललो तेव्हा ती जास्त आनंदी झाली नाही. मी शिल्पाला सांगितलं की, स्क्रिप्ट तयार आहे. आता फक्त तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत. सुरुवातीला शिल्पाला माझी कल्पना अजिबात चांगली वाटली नाही. हा चित्रपट होणार नाही, असंच तिला वाटत होतं. मग मी स्क्रिप्टवर दिग्दर्शक शाहनवाजबरोबर चर्चा केली. त्यानंतर शिल्पाला चित्रपटाविषयी संपूर्ण माहिती दिली. त्यावेळेस शिल्पाला समजलं की, चित्रपट फक्त व्यवस्थेच्या विरोधात आहे.”

हेही वाचा – Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: अखेर सईला मिळणार आईची माया? असा रंगणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणात २०२१ साली राज कुंद्राला अटक केली होती. याप्रकरणी तो २ महिने जेलमध्ये होता. सप्टेंबर २०२१मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली. तेव्हापासून राज मास्क घालून फिरत होता. त्याला मास्क मॅन असं नावही पडलं आहे.