Sonakshi Sinha Reacted On Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हा ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाक्षी अभिनयासह सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी ती अनेकदा त्यामार्फत शेअर करत असते. सोनाक्षी तिचा नवरा झहीर इक्बालबरोबरचे गमतीशीर व्हिडीओदेखील अनेकदा शेअर करत असते. अशातच नुकतच अभिनेत्रीने सोशल मीडिया उकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
झहीर व सोनाक्षीने गेल्या वर्षी २३ जून २०२४ रोजी लग्न केलं होतं. आता या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. सोनाक्षी व झहीर यांचा प्रेमविवाह झाला आहे. यापूर्वी ते आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे त्या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट झाल्याचं त्यांनी दिलेल्या मुलाखती, तसेच सोशल मीडियावरील पोस्टमधून पाहायला मिळतं.
कलाकार म्हटलं की, अनेकदा त्यांच्याबद्दल कुठल्या न कुठल्या विषयांवरून चर्चा रंगत असतात. सोनाक्षी व झहीर यांच्याबद्दलही काही दिवसांमध्ये अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अशातच आता अभिनेत्रीनं स्वत:च यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीनं नुकतीच इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.
सोनाक्षीनं शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिनं तिचा नवरा झहीर व तिच्या व्हॉट्सॲप चॅट्सचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये झहीर सोनाक्षीला “भूक लागलीये का?” असं विचारतो. त्यावर तिनं, “भूक नाही आहे. जबरदस्तीनं खाऊ घालणं बंद कर”, असा रिप्लाय दिला. पुढे झहीरनं, “मला वाटलं सुट्या सुरू झाल्या आहेत”, असा मेसेज केला. त्यावर सोनाक्षी, “मी आताच तुझ्यासमोर जेवण केलं आहे. आता नको आहे मला काही”, असं म्हणाली.
झहीरनं सोनाक्षीला पुढे मेसेजद्वारे “आय लव्ह यू” असं म्हटलं. मग त्यावर सोनाक्षीनंही “आय लव्ह यू मोअर” असं म्हटलेलं तिनं शेअर केलेल्या व्हॉट्सॲप चॅट्सच्या स्क्रीन शॉटमधून दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे सोनाक्षीनं हा स्क्रीन शॉट शेअर करत, “यामुळेच लोकांना वाटतं की, मी प्रेग्नंट आहे. असं वागणं बंद कर झहीर”, असं म्हटलं आहे. यावेळी तिनं झहीरला टॅग केलं आहे. सोनाक्षी व झहीर यांच्यामध्ये अशी नोकझोक कायमच सुरू असते. त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ ते शेअर करीत असतात. या जोडीच्या अनेक रील्स सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात.

दरम्यान, सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर नुकताच तिचा ‘निकिता रॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्रीनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तिचा भाऊ व लोकप्रिय अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश सिन्हा यानं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.