बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशाच चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘सरफरोश’ हा आहे. या चित्रपटाचा आजही चाहतावर्ग आहे. नुकतीच या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे(Sonali Bendre)च्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता. आता यावर तिने एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले आहे.

Sonali Bendre काय म्हणाली?

‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीत, सोनाली बेंद्रेने ‘सरफरोश’ चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चित्रपटसृष्टीत आपला वारसा कसा सोडणार, या प्रश्नाला तिने उत्तर देताना म्हटले की, मला वाटते एक किंवा दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा केला. प्रत्येक जण चित्रपटाच्या यशाबद्दल बोलत होता, हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे होते. जेव्हा मी २५ वर्षांपूर्वी चित्रपट केला, तेव्हा कोणाला माहीत होते की इथे बसून आपण ‘सरफरोश’बद्दल बोलणार आहे. पुढे बोलताना तिने म्हटले आहे की, सरफरोश चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अचानक मला म्हातारे झाल्यासारखे वाटू लागले आहे. कारण सगळे मला विचारत होते, तुम्ही हे कसे करून दाखवले. पण मला वाटते की, मी अजूनही शिकत आहे. वारसा या गोष्टीबद्दल आपण बोलू शकतो, त्यावर चर्चा करू शकतो. तुम्ही तुमचा वारसा सोडण्याची योजना बनवू शकत नाही, असे मला मनापासून वाटते. ‘सरफरोश’च्या सिक्वेलबद्दल अभिनेत्रीने कोणताही खुलासा केला नाही.

हेही वाचा: “रीनासाठीचे माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी मी रक्ताने…”, आमिर खानने सांगितलेला ‘तो’ किस्सा

३० एप्रिल १९९९ ला प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. आमिर खान, नसीरुद्दीन शाह आणि सोनाली बेंद्रे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाविषयी महत्त्वाची बाब अशी की, ‘सरफरोश’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी सात वर्षांचा कालावधी लागला. या सात वर्षांत संशोधन, पूर्वनिर्मिती केली गेली. जॉन मॅथ्यू मॅथन लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाला लोकप्रियता मिळाली होती. बॉक्स ऑफिसवरदेखील चित्रपटाने मोठी कमाई करत धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट इतका गाजला की, कन्नडमध्ये ‘सत्यमेव जयते’ आणि तेलुगूमध्ये ‘अस्त्रम’ या नावाने पुनर्निमिती केली.

View this post on Instagram

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
इन्स्टाग्राम

आमिर खानने चित्रपटाला २५ वर्षे झाल्यानंतर ‘सरफरोश २’ बद्दल वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, मी गेल्या अनेक वर्षांपासून जॉनला चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याबद्दल सांगत आहे. महत्त्वाचे म्हणजे, चित्रपटाचा शेवट असा झाला होता की आपण त्याचा पुढचा भाग बनवू शकतो. जॉनने उत्तम कथा लिहिली तर आम्ही त्याचा दुसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असे त्याने म्हटले होते. आता ‘सरफरोश २’ची निर्मिती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.