अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. मुलगा वायूबरोबर ती अधिकाधिक वेळ एकत्र घालवताना दिसते. सध्या सोनम पती आनंद व मुलाबरोबर उत्तराखंडमध्ये व्हॅकेशन एण्जॉय करत आहे. आज सोनमच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. आता सोनमबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. तिने वांद्रे येथील तिचं एक घर विकलं आहे.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

‘आजतक’च्या वृत्तानुसार, २०१५मध्ये सोनमने गुंतवणूक म्हणून वांद्रे परिसरात कोट्यवधी रुपयांचं घर खरेदी केलं होतं. ३१ कोटी ४८ लाख रुपयांना हे घर तिने खरेदी केलं. आता सोनमने तिचं हे घर विकलं आहे. डिसेंबर २०२२मध्ये ३२ कोटी ५० लाख रुपयांना सोनमने घर विकलं.

सोनमला यामधून अधिक आर्थिक फायदा झाला नसल्याचं समोर आलं आहे. सिग्नेचर इमारतीमध्ये सोनमचं हे घर होतं. तिसऱ्या मजल्यावर असलेलं सोनमचं हे घर SMF इन्फ्रास्ट्रक्चरने खरेदी केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत अद्यापही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंतचं घर पाहिलंत का? स्वयंपाक घरात कुटुंबीयांसाठी बनवतोय जेवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी जान्हवी कपूरनेही तिचं घर विकलं होतं. जान्हवीचं घर राजकुमार रावने खरेदी केलं होतं. जवळपास ४४ कोटी रुपयांना राजकुमारने हे घर खरेदी केलं. त्यानंतर जान्हवीने ६५ कोटी रुपयांचं नवं घर खरेदी केलं. जान्हवीने वडील बोनी कपूर यांच्याबरोबर मिळून ही आर्थिक गुंतवणूक केली आहे.