लोकप्रिय गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी तीन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. त्यांच्या घरातून तब्बल ७२ लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार सोनूच्या बहिणीने पोलिसांत दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ही चोरी त्यांच्या आधीच्या ड्रायव्हरने केली असल्याची माहिती समोर आली होती. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीची रक्कमही जप्त केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह

चोरी करणाऱ्या ड्रायव्हरचं नाव रेहान आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ७० लाख ७० हजार रुपये जप्त केले आहेत. २२ मार्च रोजी सोनू निगमची बहीण निकिता हिने रेहानविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रेहानविरुद्ध कलम ३८०, ४५४ आणि ४५७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी रेहानला कोल्हापुरातून अटक केली आहे. सोनू निगमचे वडील अगम कुमार अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा भागातील विंडसर ग्रँड बिल्डिंगमध्ये राहतात. पोलिसांना दिलेल्या जबानीत अगम कुमार यांनी ड्रायव्हर रेहानवर संशय व्यक्त केला होता.

“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

‘आज तक’च्या वृत्तानुसार, पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. फुटेजमध्ये दोन दिवस ड्रायव्हर रेहान बॅग घेऊन फ्लॅटच्या दिशेने जाताना दिसत होता. रेहान घराच्या डुप्लिकेट चावीच्या मदतीने त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसला असावा, असा संशय सोनू निगमच्या वडिलांना होता. यानंतर त्याने बेडरूमच्या डिजिटल लॉकरमधून ठेवलेले ७२ लाख रुपये चोरले. त्याला लॉकरचा कोड माहीत होता, त्यामुळे तो चोरी करू शकला. १९ ते २० मार्च दरम्यान त्याने चोरी केल्याचे बोलले जात आहे.

परिणीती चोप्राशी अफेअरच्या चर्चांवर खासदार राघव चड्ढा यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेहान मागच्या आठ महिन्यांपासून अगम कुमार यांच्याकडे काम करत होता, मात्र त्याचं काम चांगलं नव्हतं. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं, त्यानंतर त्याने हा संपूर्ण कट रचला आणि चोरी केली, असं निकिताने सांगितलं. तर, अगम कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते की, ते वर्सोवा भागात राहत असलेल्या मुलगी निकिताच्या घरी गेले होते. काही वेळाने ते परत आले असता त्यांना कपाटात ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून ४० लाख रुपये गायब दिसले. त्यांनी निकिताला फोन करून याबाबत माहिती दिली. दुसऱ्या दिवशी काही कामानिमित्त ते मुलगा सोनू निगमच्या घरी गेला असते, परत आल्यावर लॉकरमधून ३२ लाख रुपये चोरीला गेल्याचं त्यांना कळलं. अशाप्रकारे दोन दिवसांत त्यांच्या घरातून ७२ लाखांची चोरी झाली होती. याप्रकरणी ड्रायव्हर रेहानला पोलिसांनी कोल्हापुरातून अटक केली आहे.