दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिका पहिल्यांदाच अभिनेता रणबीर कपूरबरोबर झळकणार आहे. १ डिसेंबरला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची टीम ठिकठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच सध्या रश्मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री डीपफेक व्हिडीओविषयी बोलताना दिसत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं सध्या हैदराबादमध्ये प्रमोशन करत आहेत. या प्रमोशन दरम्यानचा रश्मिकाचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये तिला डीपफेक व्हिडीओविषयी विचारलं जात. तेव्हा रश्मिका म्हणते, “मी जेव्हा पहिल्यांदा डीपफेक व्हिडीओ पाहिला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला वाटलं माझ्या टीमकडून मला कुठलाही पाठिंबा मिळणार नाही. सर्वात पहिल्यांदा पाठिंबा देणारे व्यक्ती अमिताभ बच्चन होते. त्यानंतर अनेक जण मला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. सुरुवातीला डीपफेक व्हिडीओचा माझ्यावर खूप परिणाम झाला. हा डीपफेक सर्वसाधारण व्हिडीओ नसतो त्यामुळे मी यावर बोलण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा – ‘गोमू संगतीनं माझ्या तू येईशील का?’ गाण्यावर गणेश आचार्य यांनी केली रील; पण एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

पुढे रश्मिका म्हणाली, “मी जगभरातल्या सर्व मुलींना सांगू इच्छिते की, हे सामान्य नाहीये. जर एखाद्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होतोय तर गप्प बसण्याची गरज नाही. तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ शकता आणि लोकं तुम्हाला पाठिंबा देतील. आपण जिथे राहत आहोत तो एक चांगला देश आहे.”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अचानक झाला मोठा बदल, सलमान खानने केलं जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रश्मिका मंदानानंतर, कतरिना कैफ आणि काजोलाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सध्या आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ चर्चेत आला आहे.