‘तान्हाजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत सध्या चर्चेत आहे. त्याचा दुसरा चित्रपट आदिपुरुष हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दाक्षिणात्य स्टार प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे तर सैफ अली खान, क्रिती सेनॉन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेतच मात्र प्रदर्शित झालेल्या टिझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

चित्रपटाच्या टिझरची सुरवात प्रभासपासून होते. एकीकडे पाण्यात तपश्चर्या करत बसलेला दिसून आला आहे तर दुसरीकडे हातात धनुष्य घेऊन शत्रूंवर हल्ला करताना दिसत आहे. सैफ अली खान हिमालयातील एका प्रदेशात दिसत आहे. विशेष म्हणजे सैफ अली खानचे रावणाप्रमाणे दहा तोंड या टिझरमध्ये बघायला मिळत आहेत. टिझरमध्ये क्रितीची छोटी झलक बघायला मिळते. चित्रपटाच्या टिझरमध्ये उत्कंठा वाढवणारे असे पार्श्वसंगीत देण्यात आले आहे. अभिनेता शरद केळकरांच्या दमदार आवाजात आपल्याला संवाद ऐकायला येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात काही मराठी कलाकारदेखील दिसणार आहेत. चित्रपटाचा टिझर अवघ्या काही मिनिटात लाखो लोकांनी पहिला आहे. या चित्रपटात भव्यदिव्य असे व्हीएएफएक्स इफेक्टस पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट बिगबजेट आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.