Stree 2 Box Office Collection Updates : श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे ‘स्त्री २’बद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. ‘स्त्री २’ १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला अन् या चित्रपटाचा एका दिवसातच बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळाला.

‘स्त्री २’ने पहिल्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी बॉक्स ऑफिसवर ६०.३ कोटींची कमाई केली होती. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने शुक्रवारी ३१.४ कोटींचा गल्ला जमावला. शुक्रवारची आकडेवारी पाहून ‘स्त्री २’ लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार याची खात्री प्रत्येकाला होती आणि अपेक्षेप्रमाणे शनिवारी एकूण ४३.८५ कोटींची जबरदस्त कमाई करत श्रद्धाच्या ‘स्त्री २’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘बिग बॉस मराठी’ पाठोपाठ ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार नवीन मालिका; पाहा जबरदस्त प्रोमो

Stree 2 चित्रपटाचं एकूण कलेक्शन

‘स्त्री २’ने आतापर्यंत एकूण १३५.५५ कोटी कमावले आहेत. एकीकडे श्रद्धाचा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत असताना दुसरीकडे अक्षय कुमारच्या पदरी निराशा आली आहे. अक्षयच्या ‘खेल खेल में’ पहिल्या दिवशी ५.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.५ कोटी आणि शनिवारी २.८५ कोटींचा गल्ला जमावत आतापर्यंत फक्त ९.९५ कोटी कमावले आहेत. समोर आलेल्या या आकडेवारीनुसार अक्षयच्या ‘खेल खेल में’वर फ्लॉपची पाटी लागली आहे. ‘बड़े मियां छोटे मियां’ आणि ‘सरफिरा’नंतर अक्षयचा हा सलग तिसरा सिनेमा फ्लॉप झाला आहे.

हेही वाचा : “मालवणी भाषा माका कळता…”, म्हणत रितेश देशमुखने घेतला वैभवचा समाचार! रांगड्या गडीने हात जोडून मागितली माफी

stree 2
( फोटो सौजन्य : Stree 2 )

अक्षयप्रमाणे जॉन अब्राहमची जादू देखील बॉक्स ऑफिसवर अजिबात चालली नाही. ‘वेदा’ने केवळ १०.५५ कोटींची कमाई केली आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ची बिकट परिस्थिती झालेली असताना दुसरीकडे ‘स्त्री २’ने जबरदस्त कमाई केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘स्त्री २’मध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांनी या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात अनेक वरुण धवन, तमन्ना भाटिया या कलाकारांचे जबरदस्त कॅमिओ पाहायला मिळतात.