Stree2: ‘स्त्री’चा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच प्रदर्शित झाला. पहिल्या तीन दिवसांत ‘स्त्री-२’ने तब्बल १०० कोटींची कमाई केली. या चित्रपटाने सगळेच रेकॉर्डब्रेक केले असून प्रेक्षकांकडून ‘स्त्री-२’ ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चित्रपटातील मुख्य कलाकार श्रद्धा कपूर ,पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि राजकुमार राव सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. ‘स्त्री’च्या दुसऱ्या भागातही स्त्री आणि विक्कीच्या केमिस्ट्रीला भरभरून पसंती मिळत आहे. चित्रपटातील पात्र जेवढी लोकप्रिय होत आहेत, तेवढीच चर्चा होतेय ते कलाकारांच्या मानधनाची.
थोड्याच कालावधीत चित्रपटाला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे चित्रपटातील कलाकार आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘स्त्री-२’चं (Stree2) एकूण बजेट ५० ते ६० कोटी असून बॉक्स ऑफिसवर त्याने चांगलाच गल्ला जमवला आहे. या सगळ्याबरोबरच चित्रपटातील कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतलं, याबाबत नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अपारशक्ती खुराना याने (Stree2) चित्रपटासाठी ७० लाख मानधन घेतलं असल्याचं सांगितलं आहे; तर अभिषेक बॅनर्जीने ५५ लाख रुपये मानधन घेतलं आहे. या चित्रपटात वरुण धवनने त्याच्या ‘भेडीए’ या चित्रपटासाठी कॅमिओ केला होता, त्यासाठी वरुणने दोन कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
‘या’ अभिनेत्याने घेतलं ‘इतक्या’ कोटींचं मानधन
‘स्त्री’-२’साठी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी इतर कलाकारांच्या तुलनेत सर्वात जास्त मानधन घेतलं असल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने या (Stree2) चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी ५ कोटी रुपये मानधन घेतलं, तर राजकुमार राव याने विक्कीच्या भूमिकेसाठी सर्वात जास्त म्हणजे ६ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. याव्यतिरिक्त मुख्य कलाकार पंकज त्रिपाठी यांनी ३ कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिवर चांगलीच कमाई करत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ आणि दीपिकाच्या ‘कल्की’ चित्रपटाच्या पाठोपाठच आता सिनेविश्वात ‘स्त्री-२’ च्या चर्चा होत आहेत.
हेही वाचा – Video: ‘पारू’ मालिकेत नात्यांचा नवा अध्याय सुरू होणार, प्रितमची प्रेयसी प्रियाचं सत्य समोर येणार
चित्रपटाबद्दल सांगायचं तर पहिल्या भागात जो थ्रील आणि सस्पेन्स होता, तोच सस्पेन्स आणि हॉरर कॉमेडी (Stree2) दुसऱ्या भागातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट हाऊसफुल्ल होत आहे. या वर्षात प्रदर्शित झालेल्या सगळ्या चित्रपटांचा रेकॉर्डब्रेक करत ‘स्त्री-२’ ला या आठवड्यातही प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे.