बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. सुहाना सोशल मीडियावरही सक्रिय असते. अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामधल्या अनेक गोष्टी ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.

‘द आर्चिज’ या चित्रपटाद्वारे सुहानाने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील अभिनयामुळे तिला स्टारकिड, नेपोकिड म्हटलं गेलं; त्याचबरोबर सुहानाला अनेक टीकांना सामोरं जावं लागलं. अशातच आता तिचा बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकरी संतप्त झाले आहेत.

सुहाना खानने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलंय. याचे फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, ज्यात ती बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसतेय. रमजानचा पवित्र महिना सुरू असताना सुहानाने हे बोल्ड फोटोशूट केल्याने ती ट्रोल होत आहे.

“रमजान सुरू आहे, जरा तरी लाज बाळग”, “सुहाना रमजानमध्ये असं फोटोशूट योग्य नाही”, अशा प्रकारच्या नकारात्मक कमेंट्स सुहानाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अनेक जणांनी सुहानाच्या सौंदर्याचं कौतुक करत “खूप सुंदर”, “अप्सरा” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… वरुण धवनची पत्नी नताशा दलाल ‘या’ कारणामुळे होतेय ट्रोल; नेटकरी म्हणाले, “गरोदर असून…”

सुहानाने हे फोटोशूट एका ब्युटी ब्रॅंडसाठी केलं होतं. या फोटोशूटमध्ये मेसी बन, न्यूड मेकअप आणि मिनिमल ज्वेलरीमध्ये सुहाना दिसतेय.

हेही वाचा… पूजा सावंतचा बिकिनी लूक होतोय व्हायरल; हनिमूनचे फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुहानाबद्दल सांगायचं झाल्यास, ७ डिसेंबर २०२३ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चिज’ या चित्रपटात सुहाना पहिल्यांदा झळकली होती. या चित्रपटातील ‘जब तुम ना थी’ हे गाणंसुद्धा तिने गायलं होतं. सुहानाबरोबर या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर, वेदांग रैना, अदिती डॉट, मिहिर आहूजा, युवराज मेंडा यांच्याही निर्णायक भूमिका होत्या. सुहाना ‘मेबलिन न्यूयॉर्क’ आणि ‘रिलायन्स रिटेल’च्या ‘टीरा’ ब्रॅंडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडरदेखील आहे.