Arslan Goni talks about Hrithik Roshan : अभिनेता अर्सलान गोनी आणि सुझान खान गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. सुझान आधी हृतिक रोशनची पत्नी होती, त्यांना दोन मुलं आहेत. दोघांनी काही वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सुझान अर्सलानबरोबर तर हृतिक सबाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. घटस्फोटानंतरही हृतिक व सुझानचे चांगले संबंध आहेत. इतकंच नाही तर ते दोघेही आपापल्या जोडीदारांबरोबर एकमेकांना भेटतात. नुकत्याच एका मुलाखतीत अर्सलानला त्याच्या हृतिकबरोबरच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्याच्याबद्दल आदर आणि सन्मान असल्याचं तो म्हणाला.

झूमशी बोलताना अर्सलान म्हणाला, “जर तुम्ही एक चांगली व्यक्ती असाल आणि तुम्ही असं काहीही करत असाल ज्यामुळे कोणाचेही मन दुखावले जात नसेल, तर मला त्या व्यक्तीला चांगलं न म्हणण्याचं कोणतंही कारण वाटत नाही. लोक काही कारणांमुळे प्रामाणिक राहू शकत नाही. पण माझ्या वडिलांनी मला शिकवलं की वैयक्तिक आयुष्य असो वा व्यावसायिक तुम्ही प्रामाणिक असायलाच हवं.”

दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

अर्सलान म्हणाला की कदाचित त्याच्या प्रामाणिकपणामुळेच त्याच्या आजूबाजूचे लोक त्याचे कौतुक करतात. “माझ्यामध्ये इतरांना काय आवडते हे देवाला माहीत, हा माझा प्रामाणिकपणा असू शकतो. मी कधीही कोणासाठी वाईट विचार करू शकत नाही. कदाचित तेच असेल. तुम्ही फक्त प्रवाहाबरोबर जा आणि स्वतः आहात तसेच राहा. तुम्ही जसे आहात तसेच राहणे खूप महत्त्वाचे आहे, तसेच तुम्ही आहात तसेच तुम्हाला राहू देईल अशा व्यक्तीबरोबर राहा,” असं अर्सलान म्हणाला.

२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम

Sussanne Khan boyfriend Arslan Goni reacts on his relationship with Hrithik Roshan photo
हृतिक रोशन-सबा आझाद, सुझान खान-अर्सलान गोनी एकाच फ्रेममध्ये (फोटो – इन्स्टाग्राम)

सुझानबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना अर्सलान म्हणाला की ते दोघे एकमेकांचा खूप आदर करतात. “तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल आदर नसेल तर तुम्ही प्रेमात आहात, असं म्हणू शकत नाही,” असं मत त्याने व्यक्त केलं.

महाराष्ट्राचा जावई आहे ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, ऑन-स्क्रीन वहिनीच्या प्रेमात पडला अन् कुटुंबाचा विरोध पत्करून मंदिरात केलेलं लग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्सलान गोनी सध्या त्याची वेब सीरिज ‘तनाव सीझन 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ही सीरिज सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.