बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. फक्त भारतातच नाही तर परदेशाताही तिचे प्रचंड चाहते आहेत. प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर प्रियांका चोप्रा पती निक जोनससह अमेरिकेत स्थायिक झाली. आता तब्बल तीन वर्षांनी प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. तीन वर्षांनी ती कोणत्या कारणासाठी भारतात येत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता त्याचा खुलासा झाला आहे.

आणखी वाचा : दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्या ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, ‘हे’ आहे कारण

अमेरिकेच्या विमानतळावरून प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने तीन वर्षांनंतर भारतात परतत असल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून तिच्या येण्याची तिचे चाहते वाट पाहत होते. आज ती भारतात आली. मुंबई विमानतळावरील तिचा एक व्हिडीओही सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात ती विमानतळाहून बाहेर पडून गाडीत जाऊन बसताना दिसत आहे. भारतात आल्याचा आनंद प्रियांकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

प्रियांकाच्या आत्ता भारतात येण्याची काही खास कारणं आहेत. प्रियांकाला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय व्हायचं आहे. मोठ्या ब्रेकनंतर आता ती हिंदी चित्रपट करण्यास तयार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका मुंबईत दोन निर्मात्यांना भेटणार आहे. एक संजय लीला भन्साळी आणि दुसरे विशाल भारद्वाज. प्रियांका अमेरिकेतून फोनवर या दोघांच्या संपर्कात होती. ते काही प्रोजेक्ट्सवर चर्चा करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या दोघांच्या काही कल्पना प्रियांकाला आवडल्या आहेत. या चित्रपटांव्यतिरिक्त, निर्माती म्हणूनही प्रियांका एका चित्रपटाची कथा निश्चित करणार आहे.

याशिवाय प्रियांका भारतात काही जाहिरातींचे शूटिंगही करणार आहे. संजय लीला भन्साळींसोबत बोलणी करून प्रियंका चोप्रा त्यांच्या चित्रपटाबद्दल अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. भन्साळींना बऱ्याच दिवसांपासून एक चित्रपट बनवण्याची इच्छा होती आणि त्यांनी प्रियांकाला मुख्य भूमिकेत निश्चितही केले होते. पण तेव्हा प्रियांका स्वतः या चित्रपटाची निर्मिती करेल अशी अट तिने ठेवली होती. तेव्हा भन्साळींनी ही अट मान्य केली नाही. पण आता भन्साळी प्रियांकाची ही अट मान्य करून तिलाच या आगामी चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी कास्ट करतील असे बोलले जात आहे.

हेही वाचा : मालती मेरीला भेटण्यासाठी परिणीती चोप्रा उत्सुक, लाडक्या भाचीला दाखवणार ‘हा’ चित्रपट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रियांका ही लवकरच रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यासोबतच प्रियांका बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका असणार आहेत.