बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करायला नवख्या कलाकारांना बराच वेळ लागतो. मालिकांमधून बॉलीवूड स्टार होण्याची स्वप्न अनेकजण पाहतात. काहींना हे यश सहज मिळतं तर काहीजणांना निराशेला सामोरं जावं लागतं. अशाच काहिसा प्रकार मालिकाविश्वातील अभिनेता जान खान याच्याबरोबर घडला. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की एका रात्रीत त्याला एका सिनेमातून रिप्लेस करण्यात आलं होतं.

‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत जान खान म्हणाला, “एका बिग बजेट सिनेमातून मला एका रात्रीत रिप्लेस करण्यात आलं. चित्रपटाचं शूटिंग सुरू व्हायला जेमतेम एक महिना शिल्लक होता आणि अशातच मला कोणत्याच प्रकारची पूर्वकल्पना न देता एका स्टार किडबरोबर रिप्लेस करण्यात आलं. या चित्रपटासाठी मी ६ महिने वर्कशॉप केलं होतं आणि पुढचा सुपरस्टार मीच असेन असं मला वाटलं होतं. परंतु शूटिंग सुरू होण्याआधीच मला त्या चित्रपटातून काढण्यात करण्यात आलं आणि माझ्याजागी एका स्टार किडला ही संधी दिली. त्यावेळी मला खूप धक्का बसला होता, वाईट वाटलं होतं. परंतु, तेव्हा मला माझ्या मित्रांनी समजावून सांगितलं, की असं तुझ्याबरोबर पुन्हा घडू शकतं. मी हिंमत हरलो नाही तरंच मी इथे टिकून राहू शकेन.”

हेही वाचा… सुपरहिट पदार्पण, करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बलात्काराचे आरोप अन्…; ‘या’ अभिनेत्याचं करिअर संपलं

मुलाखतीत जेव्हा जान खानला विचारण्यात आलं की बॉलीवूडमध्ये बऱ्याचदा टीव्ही कलाकारांना बाजूला सारतात, असं कधी त्याला वाटलं आहे का? यावर जान म्हणाला, “खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. माझा यावर खरोखर विश्वास आहे. कोणीही इतरांच्या मतांची पर्वा करू नये. मला बऱ्याचदा ‘टीव्ही का लडका’ असं म्हटलं गेलंय, त्यावर प्रत्युत्तर देत मी नेहमी म्हणालो आहे, मी अनस खानचा मुलगा आहे, हे माझ्या वडिलांचे नाव आहे.”

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या नवाजुद्दिन सिद्दिकी आणि भूमी पेडणेकर अभिनीत ‘अफवाह’ या चित्रपटात जान खान झळकला होता. तेव्हा नवाजुद्दिन सिद्दिकीने जानला म्हटलं होतं की आयुष्यात तो खूप पुढे जाईल. “एक अभिनेता म्हणून तू काम करत राहिलं पाहिजे. भूमिका कितीही मोठी किंवा लहान असो तू प्रेक्षकांना सतत दिसशील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. चांगले आणि जास्त काम करण्याचा हा एकमेव मार्ग आहे,” असं नवाजुद्दिन जानला म्हणाला होता.

हेही वाचा… “तू सिंगल आहेस हे साफ खोटं…”; रितिका श्रोत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जान खानच्या कामाबद्दला सांगायचं झालं तर, ‘कुछ रीत जगत की ऐसी’ या आगामी टीव्ही शोमध्ये तो प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. ही मालिका हुंडा प्रथेवर आधारित आहे.