सध्या सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इअरनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवत आहेत. अभिनेता अक्षय कुमार नुकताच गोव्यात आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार नाचताना, गाताना आणि गिटार वाजवताना दिसत आहे. तो पूर्णपणे मस्तीच्या मूडमध्ये आहे. अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर सर्वजण चांगल्या प्रतिक्रिया डेट असतानाच त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने व्हिडीओवर कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे.

व्हिडीओमध्ये अक्षय कुमारने काळ्या रंगाचं हाफ जॅकेट आणि जीन्सची पॅन्ट परिधान केलेली आहे. तो नाचताना आणि पूलच्या बाजूला गिटार वाजवताना दिसत आहे. अक्षय कुमारचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला, तोच व्हिडीओ अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाला भावलेला दिसला नाही. त्यामुळे या व्हिडीओवर हटके कमेंट करत ट्विंकलने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा : कौतुकास्पद! हृतिक रोशन बनला सैन्यातील अधिकाऱ्यांचा सांताक्लॉज, त्यांना दिली ‘ही’ खास भेट

अक्षय कुमारने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात तो गिटार वाजवत गाताना दिसत आहे. या व्हिडीओवर ट्विंकल खन्नाने अक्षयच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, “मला आनंद या गोष्टीचा आहे की मी त्यावेळी वेगळ्या रूममध्ये होते आणि मी अक्शयला नाचताना गाताना पाहिलं नाही. ते दिसले नाही.” ट्विंकल खन्नाने कमेंटसोबत हसणारा इमोजीही टाकला आहे.

हेही वाचा : “त्यांनी माझे पैसे…” प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मींचा ‘हेरा फेरी’चे निर्माते फिरोज नाडियादवालांबद्दल गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२ मध्ये अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘रामसेतू’ या तिन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. तर पुढील वर्षी अक्षय कुमार ‘सेल्फी’ आणि ‘गोरखा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.