scorecardresearch

प्रभास व क्रितीच्या नात्यावर वरुण धवनने केलं शिक्कामोर्तब; म्हणाला, “तो सध्या मुंबईत….”

प्रभास- क्रिती सेनॉनच्या अफेअरच्या चर्चांबद्दल वरुण धवनचं वक्तव्य चर्चेत

प्रभास व क्रितीच्या नात्यावर वरुण धवनने केलं शिक्कामोर्तब; म्हणाला, “तो सध्या मुंबईत….”
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

क्रिती सेनॉन आणि वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट प्रदर्शित झालाय. चित्रपटाता प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून वरुण व क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान, क्रिती साऊथ सुपरस्टार प्रभासबरोबर ‘आदिपुरूष’ चित्रपटात दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. अशातच क्रिती व प्रभासच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. दोघांनीही या चर्चांवर मौन बाळगलं असलं तरी वरुणने मात्र याबद्दलचा खुलासा केला आहे.

अलीकडेच क्रिती आणि वरुण ‘झलक दिखला जा 10’ च्या फिनालेमध्ये त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी गेले होते. हा शो करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही जज करतात. वरुण आणि क्रितीही पाहुणे जज म्हणून शोमध्ये दिसले. यावळी वरुणने क्रिती आणि प्रभासच्या नात्याबद्दल एक सूचक इशारा दिला.

क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…

झलक दिखला ज च्या सेटवर करण जोहरने वरुणला प्रश्न केला की ‘क्रितीचे नाव यादीत का नाही?’ यावर क्रिती म्हणते की ‘मलाही हेच विचारायचं होतं’. उत्तरात वरुण धवन म्हणतो की, ‘कारण क्रितीचं नाव कोणाच्या तरी हृदयात आहे. एक व्यक्ती जी सध्या मुंबईत नाही आणि दीपिकाबरोबर शूटिंग करत आहे.’ वरुणचं बोलणं ऐकून क्रिती हसायला लागते. दरम्यान, वरुणने नाव न घेता ज्या व्यक्तीचा उल्लेख केला तो प्रभास होता. कारण सध्या प्रभास दीपिकासह एका फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. क्रितीने मात्र वरुणच्या वक्तव्यानंतर डोक्याला हात लावला, पण इतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आदिपुरुषच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये प्रभास आणि क्रिती सेनॉनची केमिस्ट्रीही पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून प्रभास आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत वरुण धवनच्या सूचक वक्तव्यानंतर दोघांच्याही नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:30 IST

संबंधित बातम्या