अभिनेता वरुण धवनच्या हाती सध्या बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. सध्यातरी तो त्याच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. वरुण त्याच्या खासगी आयुष्याबाबत फारसं उघडपणे बोलताना दिसत नाही. पण या चित्रपटानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो आपल्या आयुष्यामधील एक प्रसंग सांगत रडू लागला. अगदी कमी वयामध्ये जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुले वरुण यावेळी भावूक झाला.

आणखी वाचा – Video : देबिना बॅनर्जीचा प्रेग्नेंसी फोटोशूट करतानाचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल, बेबी बंप दाखवल्यामुळे ट्रोल

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२२’ या कार्यक्रमामध्ये वरुणने हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीमध्ये वरुणने आपल्या आगामी चित्रपटाबाबत तसेच चित्रपटसृष्टीमधील घडामोडींबाबत भाष्य केलं. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्यामध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला.

करोना काळात सगळंच ठप्प असताना या दिवसांनी तुला काय शिकवलं? असं वरुणला यावेळी विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, “एक व्यक्ती होती जिने माझ्याबरोबर २६ वर्ष काम केलं. मनोज त्याचं नाव होतं. त्याचं निधन माझ्या डोळ्यासमोर झालं. करोना झाल्यानंतर तो त्यामधून बरा झाला. पण त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मनोजचं निधन झालं.”

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मनोजच्या निधनामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो. आता तू यामधून बाहेर ये असा सल्ला मला प्रत्येकाने दिला. यामधून कसं बाहेर पडणार याचाच मी विचार करायचो. तो माझ्याबरोबर जवळपास २६ वर्षं होता. मी आज जो काही आहे तो त्याच्यामुळे आहे. मनोजबाबत खुलेपणाने बोलण्यात मला खूप वेळ लागला.” वरुण या प्रसंगाबाबत बोलत असताना भर कार्यक्रमामध्येच रडू लागला.