बॉलीवूड स्टार वरुण धवन आणि त्याच्या पत्नीने नुकतीच एक गुड न्यूज दिली. ३ जून २०२४ रोजी वरुण-नताशाच्या आयुष्यात चिमुकल्या मुलीचं आगमन झालं. याची गोड बातमी पहिल्यांदा बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी दिली. रुग्णालयातून बाहेर पडताना डेव्हिड धवन यांनी पापाराझींना सांगितलं की, वरुण आणि नताशाला गोंडस मुलगी झाली आहे.

आता ३ दिवसांनी ७ मे रोजी पहिल्यांदात वरुण आपल्या लेकीला घरी घेऊन जाणार आहे. नुकताच बाबा झालेल्या वरुण धवनचा इस्पितळातून लेक आणि पत्नी नताशाबरोबर रवाना होतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत वरुणने आपल्या लेकीला कुशीत घेतलेलं दिसतंय. तर त्याच्याच पाठोपाठ नताशादेखील कारच्या दिशेने चालत जाताना दिसतेय. धवन कुटुंब नव्या चिमुकलीचं लवकरच घरी स्वागत करणार आहेत.

हेही वाचा… “मी बोल्ड सीन करायला अगदीच तयार…”, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम मृणाल दुसानिसचं वक्तव्य

वरुणचा लेकीसह हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, की हे नशीबवान आईवडील आहेत ज्यांना पहिली मुलगी झालीय. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हा खूप भावनिक क्षण आहे.” तर अनेकांनी हार्टचे इमोजी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गुड न्यूज दिल्यानंतर वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. लेकीच्या आगमनानंतर इन्स्टाग्रामवर ग्राफिक व्हिडीओ शेअर करत वरुणने लिहिलं होतं, “आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।”

हेही वाचा… “मै तेरी रानी, तू मेरो हुकूम को एक्का…”, पारू फेम शरयू आणि पूर्वाने केला पहाडी गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

वरुणने गुड न्यूज दिल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. अर्जुन कपूर, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा अशा अनेक कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत वरुण-नताशाचं अभिनंदन केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वरुण आणि नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या कपलने फेब्रुवारीमध्ये एक खास फोटो शेअर करत नताशाच्या प्रग्नेन्सीची गुड न्यूज चाहत्यांना दिली.