वरुण धवनचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट जून २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. वैवाहिक जीवनातील नातेसंबंध या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. वरुण बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. करण जौहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे त्याने या क्षेत्रामध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘भेडिया’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.
आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉय म्हणून वावरणारा वरुण धवन या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच अवतारामध्ये दिसणार आहे. हॉरर या शैलीतला हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह क्रिती सेनॉन झळकणार आहे. अमर कौशिक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. वरुणनेही भेडियाच्या टीझरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम हॅंडलवर पोस्ट केला. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनच्या माध्यमातून चित्रपटाचा ट्रेलर १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली. वरुण सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
आणखी वाचा – सुश्मिता सेनच्या भावाचे पत्नी चारू असोपाशी वाद संपेनात, फोटो डिलिट केले अन्…
वरुण धवन सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आज वरुणने त्याच्या सहकाऱ्यासह मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षाने प्रवास केला. रिक्षामध्ये बसल्यावर त्याने या प्रवासातला व्हिडीओ काढून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘स्वर्ग’ चित्रपटातील ‘बम बम बंबई’ हे गाणं त्याने या व्हिडीओला जोडले आहे. या व्हिडीओमध्ये वरुण रिक्षामध्ये बसल्याचा आनंद घेत असल्याचे दिसते.अनेक महागड्या गाड्या असूनही ऑटोरिक्षामध्ये बसण्याचा मोह आवरणे त्याला जमले नाही.
आणखी वाचा – Video : क्रांती रेडकरने सिद्धार्थ जाधवची उडवली खिल्ली, त्याने दिले जशास तसं उत्तर
‘भेडिया’ व्यतिरिक्त एक्कीस या चित्रपटामध्ये तो प्रमुख पात्र साकारणार आहे. याच सुमारास तो ‘सिटाडेल’ (Citadel) या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानंतर तो साजिद नादियादवाला यांच्या ‘संकी’ चित्रपटामध्ये झळकणार आहे.