Veteran Actress On Daughter’s Divorce : बॉलीवूडमधून हल्ली अनेकदा सेलिब्रिटी कपल घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशातच आता अजून एक प्रसिद्ध जोडपं वेगळं होणार या चर्चांना उधाण आलं आहे. ही जोडी म्हणजे अभिनेता फरदीन खान व त्याची पत्नी नताशा माधवानी. काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्रीने त्यांची लेक नताशा व जावई फरदीनच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
नताशाची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज या बॉलीवूडमधील ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी चित्रपटांतून मनोरंजन करीत प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु, बराच काळ त्या बॉलीवूडपासून दूर आहेत. अशातच त्यांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. त्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत. मुमताज यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या लेकीच्या घटस्फोटाबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
मुमताज त्यांची लेक नताशा व अभिनेता फरदीन खानबद्दल म्हणाल्या, “ते असं बोलत आहेत की, ते वेगळे होणार; पण त्यांनी घटस्फोट घेतलेला नाहीये. मला फरदीन खूप आवडतो. माझ्यासमोरच त्याचा जन्म झाला होता. तर, नताशा व फरदीन अजूनही नवरा-बायकोच आहेत.” मुमताज पुढे म्हणाल्या, “फार काही गंभीर घडलेलं नाहीये. प्रत्येकाच्या लग्नामध्ये चढ-उतार येत असतात आणि बऱ्याचदा त्यांच्यातील मतभेदामुळे ते वेगळं होण्याचा निर्णय घेतात”.
मुमताज पुढे लेक व जावई फरदीनबद्दल म्हणाल्या, “ते दोघे आता खूप मोठे झाले आहेत म्हणून माझं काहीही ऐकत नाही. या मुलाखतीमध्ये मुमताज यांनी अशी ईच्छा व्यक्त केली की, त्यांच्या लेकीने व जावईने घटस्फोट घेऊ नये. कारण त्यां दोघांना दोन मुलंसुद्धा आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, “फरदीन वडील म्हणून खूप चांगला आहे. अनेकदा तो त्याच्या मुलांसाठी शूटिंगच्या वेळांमध्ये बदल करतो. जरी त्यांनी घटस्फोट घेतला तरी मुलांमुळे ते वेगलं राहू शकणार नाही”.
मुमताज यांनी फरदीनचे वडील दिवंगत अभिनेते फिरोज खान यांच्यासह ‘वो कोई और होगा’, सीआयडी, ‘आग’, ‘मेला’, ‘उपासना’ आणि ‘अपराध’ यांसारख्या चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. यासह फिरोज खान अभिनयाव्यतिरिक्त दिग्दर्शक व निर्मातेसुद्धा होते.
दरम्यान, मुमताज यांच्याबद्दल बोलायचं झालं. तर नुकतच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमधून बॉलीवूडमध्ये पुनरागम करणार असल्याचं सांगितलं होते. परंतु, या वेब सीरिजमधील त्यांना ऑफर झालेली भूमिका आवडली नाही. म्हणून त्यांनी या वेब सीरिजमध्ये काम करण्यास नकार दिला होता.