अभिनेता विकी कौशल नेहमी चर्चेत असतो. विकीचे ‘मसान’, ‘उरी’, ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट चांगलेच गाजले. सोशल मीडियावर विकी नेहमीच सक्रिय असतो. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यातून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतच एका मुलाखतीत विकीने त्याच्या लहानपणीचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- लग्नामध्ये ‘या’ डिझायनरच्या लेहंग्यामुळे खुलणार परिणीती चोप्राचं सौंदर्य; कपड्यापासून दागिन्यांपर्यंतची माहिती समोर

विकी म्हणाला, एका कुटुंबीयांना भेटण्यासाठी तो पंजाबला गेला होता. त्यावेळी गावात वीज नव्हती आणि सर्वजण संध्याकाळी सात वाजता झोपायचे. खेळता खेळता त्याने एकदा खिळे खाल्ले. त्यानंतर त्याने हा प्रकार आईला सांगितला. आईने त्याला चापट मारायला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात नेऊन एक्स-रे काढण्यात आला. डॉक्टरांनी सल्ला दिला की जर २-३ दिवसांत खिळे स्वतःहून बाहेर आले नाहीत तर ऑपरेशन करावे लागेल.

विक्कीने म्हणाले की, ऑपरेशनच्या नावाने माझ्या घरातले घाबरले होते. आम्ही जेव्हा कधी गावी जायचो तेव्हा सर्व काकू-काका जमायचे. माझ्या पोटातला खिळा काढण्यासाठी ते मला दूध आणि केळी खायला द्यायचे. त्यामुळे मी दिवसातून कितीतरी वेळा बाथरूमला जायचो.

हेही वाचा- देव आनंद यांचा जुहूतील ७३ वर्षीय जुना बंगला विकला? दिवंगत अभिनेत्याच्या पुतण्याने सांगितलं सत्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता विकी कौशल लवकरच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि बहुचर्चित ‘सॅम बहादूर’ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ मध्ये त्याच्यासह मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर प्रमुख भूमिका साकारणार आहे.