scorecardresearch

डेटिंगची इच्छा व्यक्त करणाऱ्या अनन्या पांडेकडे आर्यन खानचं दुर्लक्ष, पाहा नेमकं काय घडलं

एका मुलाखतीत अनन्या पांडेने आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

डेटिंगची इच्छा व्यक्त करणाऱ्या अनन्या पांडेकडे आर्यन खानचं दुर्लक्ष, पाहा नेमकं काय घडलं
या पार्टीमध्ये अनन्या पांडे आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खान यांच्यात काहीतरी बिनसल्याचं दिसून आलं.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्यांच्या वडिलांप्रमाणेच हॅन्डसम आहे. अर्थात शाहरुखने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आर्यनला अभिनय क्षेत्रात फारशी रुची नाही. पण जेव्हा नुकतीच आर्यन खानने माधुरी दीक्षितच्या ‘मजा मा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली तेव्हा मात्र त्याने सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं.

आर्यन खानने माधुरी दीक्षितच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी त्याच्यासह त्याची बहीण सुहाना खानही या इव्हेंटला उपस्थित होती. याशिवाय बॉलिवूडमधील बरेच नावाजलेले कलाकारही या स्क्रिनिंगला पोहोचले होते. यात अभिनेत्री अनन्या पांडेचा समावेश होता. विशेष म्हणजे अनन्या ही सुहाना खानची बालपणीची मैत्रीण आहे. एवढंच नाही तर दोन्ही कुटुंबातही विशेष मैत्री आहे. अनन्या शाहरुखला तिच्या वडिलांप्रमाणे मानते. पण या पार्टीमध्ये अनन्या पांडे आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खान यांच्यात काहीतरी बिनसल्याचं दिसून आलं.

आणखी वाचा- शाहरुख खानच्या ‘या’ सवयीचे कौतुक करत रितेश देशमुख म्हणाला, “तो निरोप देण्यासाठी…”

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात आर्यन खान या इव्हेंटमधून बाहेर जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे याच व्हिडीओमध्ये अनन्या पांडे त्याच्याकडे पाहताना दिसत आहे. पण इव्हेंटमधून बाहेर पडत असलेला आर्यन खान अनन्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. तो तिच्याकडे न पाहताच पटपट चालत तिथून निघून जाताना दिसत आहे.

एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “किती वाईट पद्धतीने त्याने अनन्या पांडेकडे दुर्लक्ष केलं.” हे तर सर्वांनाच माहीत आहे की अनन्या पांडेला आर्यन खान आवडतो. तिने काही काळापूर्वी कॉफी विथ करण सीझन ७ मध्ये हजेरी लावली होती आणि यावेळी आर्यन खानला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोघंही बालपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांच्या कुटुंबांमध्येही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण आता आर्यनने अनन्याकडे अशाप्रकारे दुर्लक्ष केल्याने हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

आणख वाचा-“ही तर सर्कशीतील…” अनन्या पांडेच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

दरम्यान आर्यन खानचं अलिकडेच केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्याने हे फोटोशूट एका स्पोर्ट्स ब्रॅण्डसाठी केलं असून २४ वर्षीय आर्यन खान या फोटोशूटमध्ये त्याच्या वडिलांप्रमाणे दिसत आहे. आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याला अभिनयात फारशी रुची नाही मात्र लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तो तयार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या