Virat Kohli’s Sister In Law : विराट कोहली व अनुष्का शर्माकडे कला व क्रीडाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. गेल्या काही वर्षांपासून हे दोघंही लंडन येथे राहतात. मात्र, दोघांची कुटुंब भारतात आहेत. कोहली कुटुंबीयांचं गुरुग्राम येथे आलिशान घर आहे. विराटने नुकतीच या घराची जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी मोठा भाऊ विकासला सुपूर्द केली.
विराटच्या मोठ्या भावाचं नाव विकास कोहली असून त्याला मोठी बहीण देखील आहे, जिचं नाव आहे भावना. विराटचे मोठे बंधू विकास कोहली यांच्या पत्नीचं नाव चेतना कोहली असं आहे.
चेतना कोहली सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मात्र, आता त्यांची चर्चा होण्यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे, अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपल्या मोठ्या जाऊबाईंच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे.
चेतना कोहली यांना योगा करण्याची खूप आवड आहे. स्वत:चा फिटनेस जपण्यासाठी त्या नियमित योगा करतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये योगासनांचे विविध प्रकार केल्याचे पाहायला मिळत आहेत. स्वत: अनुष्का शर्माने त्यांचं कौतुक केलं आहे. “प्रत्येक आसन अगदी परफेक्ट आहे… चेतना तुझा खूप खूप अभिमान वाटतोय” चेतना यांनी ही पोस्ट रिशेअर करत अनुष्काचे आभार देखील मानले आहेत.
चेतना व विकास अनेकदा विराटला मॅचदरम्यान चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आले आहेत. आयपीएल सामने पाहण्यासाठी हे दोघंही हमखास येतात. मात्र, विकास-चेतना लाइमलाइटपासून दूर असतात. या दोघांच्या मुलाचं नाव आर्यवीर कोहली असून काही दिवसांपूर्वीच तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता.
विराट-अनुष्का सध्या लंडनला तर, विकास-चेतना गुरुग्राम येथे राहतात. वेगवेगळ्या शहरात राहत असूनही चेतना व अनुष्का यांच्यात खूप छान नातं आहे.


दरम्यान, विराट-अनुष्काच्या दिल्लीत पार पडलेल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये संपूर्ण कोहली कुटुंब एकत्र दिसलं होतं. याशिवाय यंदा विराटच्या RCB ने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यावर या सगळ्या कुटुंबीयांनी एकत्र मिळून आनंद साजरा केला होता.