दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यांना न पटणाऱ्या गोष्टींवर ते अगदी बेधडकपणे बोलत अनेक बड्या नेत्यांवर टीका करताना दिसतात. तर आता त्यांनी राहुल गांधी हे बेजबाबदार आहेत असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी नुकताच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ते ‘न्यूज चे’ला मुलाखत देताना दिसत आहेत. या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांना न पटणाऱ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “मी बीफ खायचो पण…,” विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा, म्हणाले…

या व्हिडीओच्या सुरुवातीला ते ‘द काश्मीर फाईल्स’बद्दल बोलताना दिसत आहेत. ते म्हणाले, “हा चित्रपट काश्मीरमधील स्थानिक लोकांची आणि त्यांना ठार करणाऱ्या दहशतवाद्यांची कथा आहे. ज्या दहशतवाद्यांनी लोकांना ठार केलं त्यांना चित्रपटात चांगलं कसं दाखवता येईल? स्वतःला डावे, कम्युनिस्ट आणि समाजवादी म्हणवणारे हे सर्व लोक अब्जाधीश आहेत. या सर्वांकडे मोठाली कोठारं आहेत. हे सर्व लोक फर्स्ट क्लासने प्रवास करतात. मला हेट स्पीच देण्याबाबत काहीही प्रॉब्लेम नाही. कारण राग हाही एक माणसाच्या स्वभावाचा भाग आहे. हेट स्पीच देताना जोपर्यंत तुम्ही आक्रमक होत नाही तोपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही.”

हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “जेवढं मला कळतं त्यावरून मला असं वाटतं की, राहुल गांधी खूप बेजबाबदार आहेत. ते देशाच्या हितासाठी काम करत नाहीत. ते देशाबाहेर जाऊन हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते खूप धोकादायक आहे.” त्यांचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. तर याच मुलाखतीमध्ये त्यांनी ते काही वर्षांपूर्वी अमेरिकेत असताना बीफ खात होते पण आता ते सात्विक आहार घेतात असाही खुलासा केला. याचबरोबर राजकारणात येण्याचा त्यांचा कोणताही मानस नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.