विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट २०२२ मधील यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. यानंतर आता विवेक अग्निहोत्री ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ सीरिज घेऊन आले आहेत. याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली, या प्रकरणाचे सध्या देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. याच दरम्यान एका ट्विटर युजरने विवेकला मणिपूर फाइल्स बनविण्याचं आव्हान दिलं.

मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून संतापला अक्षय कुमार; म्हणाला, “असे भयंकर कृत्य…”

‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ याबद्दल विवेक अग्निहोत्रींनी शुक्रवारी एक पोस्ट केली होती.”काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर भारतीय न्यायव्यवस्था आंधळी आणि मूक राहिली. तरीही आपल्या संविधानात दिलेल्या वचनानुसार काश्मिरी हिंदूंच्या हक्कांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर एका युजरने कमेंट केली.

सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”

युजरने लिहिलं, “वेळ वाया घालवू नका, मर्द असाल तर जा आणि मणिपूर फाईल्स चित्रपट बनवा.” या ट्विटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, “माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला माझ्याकडूनच सर्व चित्रपट बनवून घ्यायचे आहेत का? तुमच्या ‘टीम इंडिया’मध्ये एकही ‘मर्द’ चित्रपट निर्माता नाही का?”विवेक अग्नीहोत्रींनी ट्विटर युजरला दिलेल्या उत्तराचं ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली होती. इतकंच नव्हे तर पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.