War 2 Teaser : अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.
आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. कबीर माझी नजर कधीपासून तुझ्यावर आहे. भारताचा सर्वोत्तम सैनिक, रॉचा बेस्ट एजंट तू होतास आणि आता नाही, असा एक डायलॉग या टीझरमध्ये ऐकायला येतो. हा आवाज ज्युनिअर एनटीआरचा असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता पुढे म्हणतो की, तू मला ओळखत नाहीस. पण, लवकरच तू मला ओळखशील. युद्धासाठी तयार राहा. यादरम्यान मारामारी, अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. ज्युनिअर एनटीआरचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे.
टीझरमध्ये पुढे हृतिक रोशनची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळते. अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील हटके अंदाजात पाहायला मिळत आहे. ती बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे. ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन समोरासमोर येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असल्याचे दिसत आहे.
नेटकऱ्यांनी ‘वॉर २’च्या टीझरचे कौतुक केले आहे. “चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे”, “हृतिक रोशन खरा सुपरस्टार आहे”, “हृतिक रोशनचा लूक उत्तम आहे”, “हृतिक रोशनला बॉलीवूडचा ग्रीक गॉड का म्हटले जाते, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले”, “टीझर पाहिल्यानंतर अंगावर काटा आला”, अशा अनेक कमेंट्स ‘वॉर २’च्या टीझरवर पाहायला मिळत आहेत.



अनेकांनी हा टीझर उत्सुकता वाढविणारा असल्याचे म्हटले आहे. टीझरमधील हृतिक रोशनच्या लूकने प्रेक्षकांना भुरळ पडल्याचे कमेंट्समधून दिसत आहे. तसेच चाहत्यांनी ज्युनियर एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय अभिनेता ज्युनियर एनटीआर आज ४१ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
१४ ऑगस्ट २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘वॉर २’ हा बहुभाषिक सिनेमा असून हिंदी, तमीळ व तेलुगू या भाषांमध्ये तो जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘वॉर २’ हा चित्रपट वायआरएफ (YRF) स्पाय युनिव्हर्समधील सहावा सिनेमा आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’ व ‘टायगर ३’ हे सुपरहिट ठरले आहेत. आता ‘वॉर २’च्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. असाच प्रतिसाद चित्रपटाला मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.