अभिनेता सनी देओल सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गदर २’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तो महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये चित्रपटाचं शूटिंग करत आहे. यावेळी अभिनेत्याबरोबर एक किस्सा घडला. इथल्या एका शेतकऱ्याने अभिनेत्याला सनी देओलसारखा दिसत असल्याचं म्हटलं. त्याने इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“तुम्ही फडणवीस साहेबांना शोभत नाही” अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले…

सनी देओल आणि त्याची टीम महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये शूटिंग करत आहे. यावेळी त्यांनी रस्त्याने बैलगाडी घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला थांबवलं. व्हिडीओमध्ये त्याला तो काय घेऊन जातोय आणि कसा आहे, याबद्दल विचारलं. त्यावर ती घरच्या जनावरांसाठी ज्वारीची भुशी असल्याचं उत्तर त्याने दिलं. यानंतर सनी देओल फ्रेममध्ये आला व त्याने त्या व्यक्तीशी हस्तांदोलन केलं.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर सनीने त्याला विचारले की तू कुठे जात आहेस आणि तो म्हणाला, ‘तुम्ही सनी देओलसारखे दिसता.’ त्यावर सनी हसला आणि म्हणाला, ‘हो, मीच आहे.’ सनी देओलला भेटून तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, ‘अरे बाप रे.’ सनी म्हणाला, ‘मी इथे आलोय, मला माझ्या गावाची आठवण आली आहे.’ यावर तो माणूस म्हणाला, ‘आम्ही तुमचे व्हिडीओ आणि तुमचे वडील धर्मेंद्र यांचे व्हिडीओ ऑनलाइन पाहत असतो.’

MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?

सनीने या व्हिडीओबरोबरच त्या शेतकऱ्यासह काढलेला एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.