८०च्या दशकातील सुपरस्टार धर्मेंद्र यांचे अनेक किस्से आहेत, जे आजही चांगलेच चर्चेत असतात. आपल्या दमदार अभिनयानं ओळखला जाणारा हा अभिनेता इंडस्ट्रीमधील प्रत्येक व्यक्तीबरोबर खेळीमेळीचं नातं ठेवत असे. चित्रपटाच्या सेटवर ते खूप फ्लर्टिंग करायचे. पण, एकेकाळी धर्मेंद्र यांना काजोलच्या आईबरोबर फ्लर्टिंग करणं चांगलंच महागात पडलं होतं. अभिनेत्री तनुजा यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट धर्मेंद्र यांच्या कानशिलात लगावली होती. नेमकं काय घडलं होतं, वाचा.

हेही वाचा – तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा डान्स; नेटकरी म्हणाले, “अजय देवगण व सनी देओल…”

काजोलची आई म्हणजे अभिनेत्री तनुजा या एकेकाळी आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, एके दिवशी धर्मेंद्र तनुजा यांच्याशी फ्लर्ट करू लागले. हे तनुजा यांना मुळीच आवडलं नाही. त्यामुळे तनुजा यांनी अभिनेता खूप मोठा आहे, तो सुपरस्टार आहे, असा कुठलाही विचार न करता धर्मेंद्र यांच्या कानशिलात लगावली. एवढंच नाही, तर त्यांनी धर्मेंद्रला निर्लज्ज म्हटलं. एका मुलाखतीमध्ये तनुजा यांनी हा किस्सा सांगत, मारण्यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा – “उगाचच कुणाच्यातरी पदरी…”, ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर दिग्दर्शक विजू मानेंचे वक्तव्य

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर व तनुजा यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे लग्न होऊनही अभिनेता इतर महिलांबरोबर फ्लर्ट करतो हे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. जेव्हा धर्मेंद्र यांनी तनुजा यांच्याबरोबर फ्लर्ट केलं, तेव्हा त्यांनी थेट त्यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी आपली चूक मान्य करून अभिनेत्रीची माफी मागितली. “तनुजा मला माफ कर, मी तुझ्या भावासारखा आहे”, असं धर्मेंद्र म्हणाले होते. हे वाक्य ऐकताच अभिनेत्रीनं तिथे असलेला एक काळा धागा घेऊन धर्मेंद्र यांच्या हातावर बांधला.

हेही वाचा – सलमान बिग बॉसमधून बाहेर, आता कुठल्याही पर्वात करणार नाही सूत्रसंचालन?

अभिनेत्री तनुजा या शोभना समर्थ व चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ यांच्या कन्या आहेत. त्यांनी निर्माते शोभू मुखर्जी यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांच्यापासून त्यांना काजोल व तनुषा नावाच्या दोन मुली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.