बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकीची इफ्तार पार्टी दरवर्षी चर्चेत असते. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला केवळ बॉलिवूडच नाही तर छोट्या पडद्यावरील स्टार्सही हजेरी लावतात. नुकतेच रविवारी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचे आयोजन मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंत अनेक कलाकार सहभागी झाले होते. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हे बाबा सिद्दीकी नेमके आहेत तरी कोण. ज्यांच्या एका हाकेवर सलमान आणि शाहरुख खान धावत येतात. त्यांची नेटवर्थ काय आहे. जाणून घेऊयात.

हेही वाचा- Video : चाहतीबरोबर सेल्फी घेणाऱ्या सलमान खानला बाबा सिद्दीकींनी ओढले; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “अरे..”

बाबा सिद्दीकी मुंबई काँग्रेसचे नेते आहेत. कॉलेजमध्ये शिकत असताना बाबांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले. बाबांनी मुंबईच्या एमएमके कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबांनी दोन वेळा नगरसेविक म्हणून काम पाहिले. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा आमदार होते आणि या काळात त्यांना राज्यमंत्री करण्यात आले होते. १९७७ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. मुंबईतील मास लीडर म्हणून बाबांची ओळख आहे. आपल्या भागातील लोकांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. आमदार निधीचा वापर करत त्यांनी परिसरातील विकासकामे केली आहेत त्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबा सिद्दीकींचे नेटवर्थ

बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जातात. फ्रेझर्स लाइव्हमधील इमेज रिपोर्टनुसार, बाबा सिद्दीकी यांची एकूण संपत्ती सुमारे ७.२ दशलक्ष आहे. मात्र, काँग्रेस नेत्याची नेमकी कमाई किती आहे, याची माहिती मिळालेली नाही. बाबा सिद्दीकी यांचे मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सशीही चांगले संबंध आहेत. तो दरवर्षी रमझान दरम्यान एक मोठी इफ्तार पार्टी आयोजित करतो ज्यामध्ये राजकीय जगतातील लोक तसेच मोठ्या पडद्यावरील आणि छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटी देखील उपस्थित असतात. २०१८ मध्ये ईडीने बाबा सिद्दीकीच्या घरावर छापा टाकला होता. ज्यामध्ये सुमारे ४६२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.