बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपटनिर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता आलिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आलियाने २० मे रोजी तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत गुपचूप साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, अनुराग कश्यपचा होणारा जावई शेन ग्रेगोयर नेमका आहे तरी कोण आणि तो काय करतो? जाणून घेऊ या.

हेही वाचा- २९ वर्षांपूर्वी सुष्मिता सेनने जिंकला होता ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; खास फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

बालीमध्ये आलियाने साखरपुडा केला आहे. आलियाने या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने रिंगही फ्लॉन्ट केली आहे. फोटो शेअर करताना आलियाने लिहिलंय, “आणि हे घडलं! माझा बेस्ट फ्रेंड, पार्टनर आणि आता माझा होणारा नवरा… तू माझं प्रेम आहेस. खरं आणि नि:स्वार्थ प्रेम काय असतं, ते दाखवल्याबद्दल थँक यू. तुला होकार देणं ही माझ्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट होती. तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवण्यासाठी मी उत्सुक आहे,” असं म्हणत आलिया कश्यपने पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by aaliyah (@aaliyahkashyap)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुराग कश्यपचा जावई नेमका आहे तरी कोण आणि काय करतो?

आलिया कश्यपचा होणारा नवरा शेन ग्रेगोयर २३ वर्षांचा असून तो व्यवसायाने अमेरिकन उद्योजक आहे. रॉकेट पॉवर्ड साउंड नावाच्या कंपनीचा तो संस्थापक आहेत. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी साउंड डिझायनिंग आणि संगीतनिर्मिती कौशल्ये (Music Devevlopment skill) विकसित करते. आलिया अनेकदा शेनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आलिया आणि शेन गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आलिया २२ वर्षांची आहे आणि व्यवसायाने व्लॉगर आहे. ती अनेकदा यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करत असते. आता हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.