विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केल्याने भारतीय क्रिकेटप्रेमी प्रचंड नाराज झाले होते. परंतु, या सगळ्यात स्टेडियममधील दुसऱ्याच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचा धाकटा लेक अबराम यांच्यातील सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.

बॉलीवूडचा किंग खान त्याच्या संपूर्ण परिवारासह अंतिम सामना पाहण्यासाठी पोहोचला होता. या सामन्यादरम्यान शाहरुखची मुलगी सुहाना खान आणि धाकटा लेक अबराम यांनी रणवीर-दीपिकाची भेट घेतली. दोघांची मिठी मारून त्यांची विचारपूस केली. अबरामला पाहून दीपिका फारच आनंदी झाली होती.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, अरुण कदमांचे सगळे फोटो केले डिलीट

अबरामला मोठ्याने हाक मारून दीपिकाने जवळ बोलावलं आणि त्याला मिठी मारत त्याचे खूप लाड केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दीपिका-रणवीरचं शाहरुखच्या कुटुंबीयांबरोबर फारचं सुंदर नातं आहे. त्यामुळे छोट्या अबरामला पाहून दीपिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

हेही वाचा : ‘झिम्मा २’च्या सेटवर सायली अन् रिंकूने सिद्धार्थ चांदेकरसाठी बनवल्या होत्या भाकऱ्या; अभिनेता म्हणाला, “सगळ्या बायकांनी मिळून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिकाने अबरामला प्रेमाने जवळ घेतल्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना अभिनेत्रीचा ‘जवान’मधील तिचा कॅमिओ आठवला. ‘जवान’मध्ये दीपिकाने साकारलेली ऐश्वर्या राठोड सुद्धा तिच्या बाळाला अशीच प्रेमाने जवळ घेत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, ‘जवान’मधील ऐश्वर्या राठोड या पात्रासाठी शाहरुख खानने स्वत:हून दीपिकाला विचारलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता लवकरच राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटातून शाहरुख खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.