Haq vs The Girlfriend Box Office Collection Day 1: अभिनेत्री यामी गौतमचा ‘हक’ आणि रश्मिका मंदानाचा ‘द गर्लफ्रेंड’ हे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. ७ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या दोन्ही चित्रपटांना सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘हक’मध्ये शाह बानो प्रकरणाची कथा दाखवण्यात आली आहे. तर रश्मिका मंदानाचा ‘द गर्लफ्रेंड’ हा महिलाप्रधान चित्रपट आहे.

‘द गर्लफ्रेंड’ व ‘हक’ दोघातही कडक स्पर्धा आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फार चांगली ओपनिंग केलेली नाही. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी रश्मिका व यामीच्या चित्रपटापैकी कोणत्या सिनेमाने बाजी मारली? जाणून घेऊयात.

‘हक’ सिनेमाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

Haq Box Office Collection Day 1: सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, यामी गौतमच्या ‘हक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.६५ कोटींची कमाई केली. सिनेमाची ओपनिंग फार चांगली झालेली नाही. पण यामी गौतमच्या हक चित्रपटाची सगळीकडे फार चर्चा आहे, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामी गौतमच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

‘द गर्लफ्रेंड’चे ओपनिंग कलेक्शन किती?

रश्मिका मंदानाच्या ‘द गर्लफ्रेंड’ ने यामी गौतमच्या ‘हक’ पेक्षा कमी कमाई केली. ‘द गर्लफ्रेंड’ ने पहिल्या दिवशी १.३० कोटी कमाई केली. या चित्रपटातील रश्मिकाचा अभिनय प्रेक्षकांना फार आवडला आहे. चाहते आणि सेलिब्रिटी देखील तिचं कौतुक करत आहेत.

‘हक’ चित्रपटात कलाकारांची मांदियाळी

‘हक’ चित्रपटात यामी गौतम, इमरान हाश्मी, वर्तिका सिंह आणि शीबा चड्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाह बानो प्रकरणावर आधारित या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. कलाकारांच्या अभिनयाचे आणि कथानकाचे लोक कौतुक करत आहेत.

‘द गर्लफ्रेंड’मध्ये कोणते कलाकार आहेत?

‘द गर्लफ्रेंड’मध्ये रश्मिका मंदानाबरोबर दीक्षित शेट्टी, रोहिणी, राव रमेश व कौशिक मेहता मुख्य भूमिकेत आहेत.