Dhoom 4 Update : किंग खान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात जॉन अब्राहमने खलनायक जीमची भूमिका साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यांचा अभिनय खूप आवडला होता. त्याने आपली भूमिका इतकी गांभीर्याने साकारली की लोकांना शाहरुखपेक्षा जॉनची भूमिका जास्त आवडली. आता लवकरच यशराज फिल्म्स त्यांच्या लोकप्रिय फ्रेंचाइज ‘धूम’च्या चौथ्या भागात जॉन अब्राहमला खलनायक म्हणून घेण्याचा विचार करत आहे.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार जॉन अब्राहमच्या पठाणमधील दमदार अभिनयानंतर, जर निर्मात्यांनी धूम फ्रँचायझी पुढे नेण्याचा निर्णय घेतला तर जॉन हा सर्वोत्तम पर्याय असेल. बॉलिवूड हंगामाच्या सूत्राने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला जॉन अब्राहमने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. यामुळेच यशराज फिल्म्सला त्याला पुन्हा नकारात्मक भूमिकेत घ्यावे असे वाटत आहे.

आणखी वाचा : सारा अली खान बिचारी तर, आशिष चंचलानी जाडा; प्रसिद्ध अभिनेत्याने ट्वीट करत घेतलं दोन कलाकारांवर टीका

अद्याप जॉन किंवा इतर कोणी या बातमीची पुष्टी केलेली नाही. ‘धूम ४’ साठी शाहरुख खान, सलमान खान यांचेही नाव काही काळापासून समोर आले आहे. इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटात अक्षय कुमार दिसणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र यशराज फिल्म्सच्या प्रोडक्शन हाऊसने ही बातमी फेटाळून लावली आहे.

View this post on Instagram

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशराज फिल्म्सच्या धूम फ्रँचायझीचा पहिला चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये जॉन अब्राहमने नकारात्मक भूमिका साकारली होती. आत्तापर्यंत याचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. याच्या तिसर्‍या भागात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. आता ‘धूम’चे चाहते चौथ्या भागाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत, आणि त्यात जॉन अब्राहम जर कमबॅक करणार असेल तर ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.