Ramdev baba on Shefali Jariwala and Sidharth Shukla death: ‘काँटा लगा’फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (वय ४२) हिचे २७ जूनला अकस्मात निधन झाले. तिच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेकांना शेफालीच्या अचानक निधनाने धक्का बसल्याचे सोशल मीडियावरील पोस्टवरून पाहायला मिळाले.

सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने शेफालीचे निधन झाले आहे, असे मानले जात होते. मात्र, त्यानंतर बीपी कमी झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असाही अंदाज केला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, शेफालीच्या मृत्यू प्रकरणात कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही आणि मृत्यूच्या कारणाबद्दल डॉक्टरांनी त्यांचं मत अद्याप सांगितलेलं नाही, असे मुंबई परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम म्हणाले.

रामदेव बाबा काय म्हणाले?

आता शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर माणसाच्या जीवनशैलीबद्दल रामदेव बाबांनी वक्तव्य केले आहे. रामदेव बाबांनी एनडीटीव्हीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “माणसाचं आयुर्मान १०० वर्षे नाही, तर १५० ते २०० वर्षे इतके आहे. सध्या लोक मेंदू, हृदय, डोळे, फुप्फुसा या अवयवांवरर जास्त ताण देत आहेत. माणसाला जे १०० वर्षांत खायला हवं, ते माणूस २५ वर्षांत खातो. माणसानं जर स्वत:ची योग्य प्रकारे काळजी घेतली, तर तो १०० वर्षं म्हातारा होणार नाही.”

पुढे रामदेव बाबा, “माणसांचं आयुर्मान किती असावं, हे त्या-त्या व्यक्तीच्या हातात आहे. व्यवस्थित आहार घेतला जात असेल, संतुलित जीवनपद्धती असेल, तर १०० वर्षं आयुष्य जगता येऊ शकतं. माझं वय आता ६० वर्षं आहे; पण, योग, संतुलित आहार व उत्तम जीवनशैली यांमुळे मी निरोगी, फिट आहे,” असे म्हणाले.

सिद्धार्थ शुक्ला व शेफाली जरीवाला हे तंदुरुस्त दिसत होते. तरीही त्यांचे अचानक निधन झाले. यावर रामदेव बाबा यांनी, “माणसासाठी आरोग्य महत्त्वाचं आहे. त्यानं निरोगी असणं म्हणजे आतून निरोगी असणं गरजेच आहे. त्यांचं हार्डवेअर चांगलं होतं; पण सॉफ्टवेअर खराब होतं. माणूस जितका बाहेरून निरोगी दिसतो, तितकाच तो आतूनही निरोगी असायला हवा”, असे मत मांडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शेफाली जरीवालाची मैत्रीण पूजा घई एका मुलाखतीत म्हणालेली, “शेफाली तिच्या आरोग्याची, तसेच दिसण्याची खूप काळजी घ्यायची. आता तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.”